

पणजी : गोव्यात(Goa) मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने मान्सूनच्या (Monsoon)आगमनानंतर महिनाभराच्या आतच राज्यातील धरणांच्या (Dam) पाणीसाठ्यात तीन आठवड्यांत 50% हून अधिक वाढ झाली आहे.(More than 50 per cent water storage in the dam in Goa)
गेल्या काही आठवड्यांत सेलाउलीम जलाशयात पाण्याच्या पातळीत 20 टक्क्यांनी वाढ झाली असून, हे धरण 51% भरले आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील बहुतेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच कॅनाकोना तालुक्याला पाणीपुरवठा करणारे चापोली जलाशय 57% भरले आहे. दक्षिण गोव्यातील गौणम आणि पंचवडी येथील जलाशयांमध्ये पाण्याची पातळी अनुक्रमे 59% आणि 46% पर्यंत वाढली आहे.
साधारणतः दरवर्षी गोव्यातील जलाशयांमध्ये जूनच्या शेवटी किंवा जुलै महिन्यात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होते. परंतु यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील पाणीसाठ्यात आता पुरेशी भर पडलेली आहे. त्याबरोबरच गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या दोडामार्गमधील तिलारी जलाशयात, पाण्याची पातळी 63 टक्क्यांपर्यंत गेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.