कामगारदिनी पणजीत 'मोर्चा' मिरवणूक

समस्या व प्रश्‍नांवर होणार चर्चा, आयटकची माहिती
AITUC
AITUCDainik Gomantak

पणजी: आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गोव्यात अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) गोवा राज्य समितीतर्फे 1 मे रोजी पणजीत भव्य मोर्चा मिरवणूक काढण्यात येणार असून, त्याचे रुपांतर सभेमध्ये होणार आहे. हा मोर्चा कंदब बसस्थानकावरून सुरू होऊन तो पणजी चर्चचौकापर्यंत जाईल. या सभेत कामगारांच्या विविध समस्या व प्रश्‍नांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, अशी माहिती आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली.

देशात कामगार चळवळ 1890 साली सुरू झाली त्याला सुमारे 132 वर्षे पूर्ण होत आहेत. कामगार चळवळीमुळे कामगार कायदे लागू करण्यात आले; मात्र जसजसा काळ पुढे सरकत गेला तसे केंद्रातील सरकारने हे कायदे दिवसेंदिवस कमकुवत करून टाकले आहेत. त्यामुळे कामगारांना कोणाचाच आधार राहिलेला नाही. त्यामुळे जे कामगार असंघटीत आहेत त्यांनी संघटना स्थापन करून अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे आवाहन फोन्सेका यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. सुहास नाईक व प्रसन्न उट्टगी होते.

AITUC
फोंड्यातील कदंब बसस्थानक 'बंद'

गोव्यात सरकारी तसेच खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 2.5 लाख कंत्राटी कामगार काम करत आहेत. त्यांना निश्‍चित काळासाठी कंत्राटवर कामाला घेण्यात आले आहे. त्यामुळे या कामगारांना कायद्याचे काहीच संरक्षण नाही. राज्यात अकुशल कामगाराला प्रतिदिन 398 रुपये दिले जातात मात्र इतर राज्यात याच कामगारांना 635 रुपये प्रतिदिन दिली जातात. त्यामुळे राज्यात या कामगारांना किमान 750 रुपये प्रतिदिन निश्‍चित करण्याची मागणी फोन्सेका यांनी केली.

केंद्र व राज्य सरकार कामगार कायद्याचे पालन करत नाही. त्यामुळे देशात कामगार धोरण लवकर जाहीर होण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com