Mopa Road : मोपा लिंक रोडचे काम पूर्णत्वाकडे; उद्‍घाटनाची प्रतीक्षा

Mopa Road : ८०० कोटी रुपये खर्च, सुमारे साडेसहा किलोमीटर लांबी
Mopa Road
Mopa Road Dainik Gomantak

प्रकाश तळवणेकर

Mopa Road :

पेडणे, ८०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या सुमारे साडेसहा किलो मीटर लांबीच्या दुहेरी सहापदरी लिंक रोडचे काम पूर्णत्वाकडे पोचले आहे. लवकरच या रस्त्याचे लोकार्पण होणार आहे.

अशोका बिल्डकॉन कंपनीने या रस्त्याचे बांधकाम केले आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारल्यानंतर पूरक रस्ता उभारणे आवश्‍यक होते. अस्तित्वात असलेला रस्ता अरुंद तसेच लोकवस्तीतून जात होता. सुरवातीला हा रस्ता दुपदरी बनविताना बऱ्याच अडचणी आल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन कार्यकारी अभियंते आत्माराम गावडे व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने हा रस्ता दुपदरी होऊ शकला.

परंतु हा रस्ताही वाहतुकीस अपुरा असल्याने विमानतळाला जोडणारा जलद मार्ग बांधणे आवश्‍यक होते. त्यासाठी लुईबर्गर या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीने सुचविलेल्या तीन पर्यायांपैकी जो मार्ग लोकवस्ती बाहेरून जातो, त्याला राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली. हा मार्ग स्थानिक शेतकऱ्यांच्या जागेतून जात असल्याने याला प्रखर विरोध झाला. परंतु सरकारने पोलिस बळ वापरून हा विरोध मोडून काढला. या रस्त्यासाठी अंदाजे ४८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली व या रस्त्याच्या कामाला चालना मिळाली.

Mopa Road
Goa Todays Update News: नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ!

ठळक वैशिष्ट्ये

हा लिंक रोड केवळ विमानतळावर जा-ये करणाऱ्या वाहनांसाठी खुला असेल.

वेग मर्यादा १०० किलोमीटर असेल.

हा महामार्गाचे बांधकाम महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (Epc mode) करण्यात आले आहे.

हा लिंक रोड एक रेल्वे ओव्हर ब्रिज व राष्ट्रीय महामार्गावरून जातो.

सुकेकुळण येथे हा रस्ता महामार्गाला जोडला असून येथे अदलाबदल(इंटरचेंज) पूल, टोल नाका, लैंडस्केपींग आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

विमानतळावर जा ये करणाऱ्या वाहनांना कुठेही थांबावे लागणार नाही अशी या मार्गाची रचना आहे.

अंदाजे ४ कि. मी. रस्ता जमिनीवरून तर अंदाजे अडीच कि. मी. उड्डाणपूल बांधून हा रस्ता जोडला आहे.

उड्डाण पुलाचा सर्वात उंच खांब ४५ मीटरचा आहे.

हा रस्ता पूर्णत: लोकवस्ती बाहेरून जातो. सभोवतालच्या निसर्गामुळे हा प्रवास अत्यंत सुखद ठरतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com