Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

मोपा विमानतळावरील मजूर पुन्हा आक्रमक

वेतनप्रश्‍नी कामगारांचा एल्गार, संध्याकाळी वेतन मिळाल्याने विरोध मावळला
Published on

मोरजी : मोपा विमानतळावर काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने आज पुन्हा 50 कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर कंपनीने संध्याकाळपर्यंत त्यांना वेतन दिल्याने मजुरांचा विरोध तात्पुरता मावळल्याचं चित्र आहे.

Mopa Airport
विजेच्या खांबाला धडकून कारचा अपघात

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Mopa Airport) काम जीएमआर कंपनी करत आहे आणि बांधकाम क्षेत्रातील काम मेगावाईड कंपनी करत असल्याने या कंपन्यांकडे किमान दोन हजारपेक्षा जास्त मजूर विविध राज्यांतून कामाला आलेले आहेत. मोपा विमानतळाचे कंत्राटदारामार्फत काम केले जाते. परंतु कधी कधी वेळेवर वेतन न मिळाल्याने मजूर आक्रमक होतात. अशा घटना वारंवार घडत असल्याने सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहेत.

Mopa Airport
चोर्ला घाट ते साखळी रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश

यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. काही मजुरांना वेळेवर वेतन न मिळाल्याने या मजुरांनी विमानतळाच्या प्रशासकीय इमारतीवर दगडफेक करुन आंदोलन (Protest) केले होते. त्यानंतर कंपनीने मजुरांशी चर्चा करून हा विषय तात्पुरता मिटवला होता. परंतु पुन्हा मेगावाईड कंपनी मजुरांना वेळेवर वेतन देत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी येथील चार वाहनांना आग (Fire) लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही आग संतप्त मजुरांनी लावल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान आज बुधवारी मेगावाईड कंपनीने 50 मजुरांना त्यांचे वेतन न दिल्याने सर्व मजूर एकत्रितपणे प्रशासकीय इमारतीवर चाल करुन आले. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मजुरांशी चर्चा करून सायंकाळी वेतन दिले. त्यामुळे हे मजूर शांत झाले. पुन्हा असा प्रकार घडला तर आम्ही कामबंद आंदोलन करु, असा इशाराही या मजुरांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com