Mopa Airport: ‘मोपा’चे उद्‍घाटन झाल्याने पेडणेत जमिनीचे दर वधारले

लहान बाजारपेठांत 50 ते 75 टक्के उलाढाल वाढणार आहे.
Manohar International Airport
Manohar International Airport Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mopa Airport: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उत्तर गोव्यातील जमिनीचे दर 50 ते 75 टक्क्यांनी वाढले आहेत. या विमानतळामुळे पेडणे आणि बार्देश तालुक्यातील लहान 7 बाजारपेठांतील आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

एका खासगी राष्ट्रीय वृत्त वाहिनीने नुकतीच एक चर्चा घडवून आणली होती. त्यात दोन प्रख्यात रिअल इस्टेट कंपन्यांचे प्रमुख आणि वकिली व्यवसायातील ॲड. शुभम देसाई यांचा समावेश होता. मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उत्तर गोव्यातील जनजीवनावर काय परिणाम होणार आहे? तेथील अर्थव्यवस्थेत काय बदल होईल?

त्याशिवाय जमिनी विक्री व्यवहारावर त्याचा परिणाम कसा असेल? या अनुषंगाने मान्यवरांनी चर्चा केली होती. त्या चर्चेतून मोपा विमानतळाचे उद्‍घाटन होताच, काही दिवसांतच पेडणे तालुक्यातील जमिनीचे दर 50 ते 70 टक्क्यांवर गेलेले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यात विकासकच अधिक रस दाखवू शकतील, असेही या चर्चेचा सूर होता.

याशिवाय कांदोळी, मांद्रे, आसगाव, पर्रा, नेरूल, बागा आणि अंजुणा या नव्या बाजारपेठा म्हणून उदयास येतील आणि तेथील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढतील, असाही अंदाज या चर्चेत व्यक्त करण्यात आला.

मोपा विमानतळाचे उद्‍घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर काही दिवसांतच जमीन दरवाढीस प्रारंभ झाला. सहा ते सात दिवसांत जमिनींच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. मोपा विमानतळामुळे विकसित पट्टा निर्माण होईल, तेथील जागांचे दर आणखी वाढतील, अशी माहिती रिअल इस्टेटशी निगडित अँन्थनी एफ. यांनी सांगितले.

Manohar International Airport
Bjp In Goa: नरेंद्र सावईकर यांची पक्षनिष्ठा इतरांना प्रेरणादायी

स्थिती माहीत नाही..!

मोपा विमानतळामुळे जमिनीच्या दरात वाढ झाल्याची चर्चा राष्ट्रीय स्तरावरील चर्चेत होत असल्याने ही बाब महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने उत्तर गोव्यातील जमिनींच्या दरात खरोखरच वाढ झाली आहे का, याविषयी क्रेडाई गोवाचे नीलेश साळकर यांना विचारले. त्यांनी उत्तर गोव्यातील स्थिती आपणास काही माहीत नाही, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Gen Z Voters India Elections
Goa Casino Director Shooting Case
IndiGo Goa Delhi Flight Emergency Landing
Mopa Airport Link Highway Toll
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com