MOPA International Airport: येत्या ऑगस्टपर्यंत मोपा विमानतळ कार्यान्वित!

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (MOPA International airport) जवळपास 54 टक्के काम पूर्ण झाले आहे. जे आता या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू होण्यासाठी तयार आहे.
MOPA International Airport:
MOPA International Airport:Dainik Gomantak
Published on
Updated on

MOPA International Airport: गोव्यातील रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणजेच मोपा विमानतळ प्रकल्प. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (MOPA International airport) जवळपास 54 टक्के काम पूर्ण झाले आहे. जे आता या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू होण्यासाठी तयार आहे. विमानतळाच्या कामाला विलंब होण्यामागे अनेक कारणे होती. विविध न्यायालयांच्या निर्बंधांमुळे या बांधकामाला 634 दिवस उशीर झाला आणि त्यात कोरोनामुळे पुन्हा 3 महिन्यांचा फटका बसला.

MOPA International Airport:
कोरोनासंसर्ग वाढताच, वाढत्या थंडीचा परिणाम?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनल इमारत चार टप्प्यात विकसित करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात दरवर्षी 4.4 दशलक्ष विमान प्रवासी हाताळण्याची क्षमता असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात 5.6 दशलक्ष, 9.4 दशलक्ष आणि 13.1 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असणार आहे.

मोठ्या विलंबानंतर आता मोपा विमानतळ यावर्षी ऑगस्टमध्ये आता कार्यान्वित होणार आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये गोवा सरकारने (Goa Government) मोपा ग्रीनफिल्ड विमानतळ सार्वजनिक-खाजगी भागीदारी (Public-Private Partnership) मोडवर बांधण्यासाठी जागतिक निविदा काढली होती. गोवा सरकार आणि जीएमआर (GMR Company) गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्यात 8 नोव्हेंबर 2016 रोजी सवलत करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, तर मोपा विमानतळाचे बांधकाम 13 नोव्हेंबर 2016 रोजी सुरू झाले होते. सुरुवातीला विमानतळ प्रकल्पाची अंदाजे किंमत 1900 कोटी रुपये होती, परंतु आता वेळ निघून गेल्यामुळे तो 2650 कोटी रुपये करण्यात आली आहे.

MOPA International Airport:
Goa Corona Update: वास्को मामलेदार कचेरीतील चौघे कर्मचारी कोरोनाबाधित

दरम्यान, गेल्या 19 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरने (ASDC) प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com