Mopa Airport : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाची उत्तुंग भरारी! चार ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेवा सुरू

Mopa Airport : वर्षभरात तीन दशलक्ष प्रवाशांचा प्रवास
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

Mopa Airport : पणजी, जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्यातर्फे कार्यान्वित मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एमआयए) गेल्या वर्षभरापासून विविध उल्लेखनीय उपलब्धी आणि अमूल्य बोध यांचा अनुभव घेतला.

प्रवाशांची वाढती संख्या, विस्तारीत मार्ग आणि आंतरराष्ट्रीय सेवांचे सादरीकरण यांच्या जोरावर आता एमआयए २५ देशी आणि ४ आंतरराष्ट्रीय स्थळांशी जोडले गेले आहे.

इंडिगो, अकासा एअर, विस्तारा आणि स्पाईसजेट अशा देशांतर्गत चालणाऱ्या एअरलाईन्स मोपा येथे सेवा देत आहेत. तर एअर इंडिया, ओमन एअर, इंडिगो आणि तुई अशा एअरलाईन्स आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी सेवा देत आहेत. ५ जानेवारी २०२३ रोजी उद्‌घाटन झाल्यापासून ३ दशलक्षपेक्षा अधिक प्रवासी हाताळणी केलेल्या एमआयएने गोव्याच्या हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात एक निर्णायक भूमिका बजावली आहे.

ऐतिहासिक प्रवाह तोडून एमआयएने उन्हाळी मोसमात झालेली जी घट होती, तिला बाजूस सारत संपूर्ण वर्षात हवाई वाहतुकीत शाश्‍वत सातत्य राखले आहे. गोव्याशी जोडली गेलेली देशी स्थळे आता दुप्पट झाली असून त्यांची संख्या २९ वर गेली आहे.

ही सेवा प्रारंभ झाली होती, तेव्हापासून १४ देशी स्थळे वाढली आहेत. वार्षिक ८ दशलक्ष प्रवासी हाताळणीचे उद्दिष्ट ठेवल्यानंतर ते २०२४ च्या हिवाळी वेळापत्रकाआधी गाठले जाण्याच्या मार्गावर आहे.

एमआयएच्या सर्वोत्तमतेची दखल घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नोव्हेंबर २०२३ मध्ये एमआयएला देशातील उत्तम १५ विमानतळांमध्ये स्थान दिले आहे. देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील हे वेगवान भरारीचे द्योतक आहे.

साधनसुविधाः

कोड ई/एफ मानकांनुसारची धावपट्टी, विस्तृत टॅक्सीवे आणि अद्ययावत प्रवासी टर्मिनल ईमारत अशी साधनसुविधा ही बाब एमआयएसाठी एक नवलाईच ठरली आहे. हे विमानतळ नियोजनबध्दरित्या ६ पदरी एक्सप्रेसवे आणि रेल्वे सुविधा यांनी उत्तमरीत्या जोडले गेले आहे.

प्रवासी अनुभवः

एमआयएने प्रवाशांसाठी विविधांगी अनुभव घेण्याची संधी निर्माण केली आहे. क्युरेटेड सुगंधापासून ते गोमंतकीय-आशयाधारीत कला दालने, खास खाद्यपदार्थ आऊटलेटस्‌ आणि प्रत्यक्ष संगीत यांच्या आधारे एमआयएने प्रवाशांसाठी संस्मरणीय प्रवासाचा अनुभव उपलब्ध केला आहे.

सीआयआयने २०२३ साठी एमआयएला उत्कृष्ट प्रवासी अनुभव डिझाईन पुरस्कार दिला आहे. विमानतळ दर्जा सर्वेक्षणात एमआयएने ४.९ हा उल्लेखनीय मानक प्राप्त केला आहे.

पुरस्कार आणि मान्यता

एमआयएने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यात "उत्कृष्ट शाश्‍वत ग्रीनफिल्ड विमानतळ", "बांधकाम सुरक्षा", आणि "सर्वोत्कृष्ट पर्यावरणीय पध्दती" यांचा समावेश आहे.

प्रवासी टर्मिनलला आयजीबीसी प्लॅटिनम मानांकन प्राप्त झालेल्या एमआयएला शाश्‍वत पुढाकारासाठी जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. लक्षात घेण्यासारख्या उपलब्धींमध्ये लंडन येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेत आणि सीआयआय डिझाईन परिषदेत मिळालेल्या मान्यतेचा समावेश आहे.

Mopa Airport
Goa Tourism Place: गोव्यात येताय? तर मग 'से कॅथेड्रल' चर्चला नक्की द्या भेट

गेल्या वर्षभरात आम्ही साध्य केलेल्या उपलब्धींचा आम्हांला अभिमान वाटतो. जीएमआर, गोवा विमानतळावरील सेवांमध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी सुधारणा करण्याची ग्वाही आम्ही देतो. त्या अनुषंगाने आम्ही विमानतळावरील आमच्या प्रत्येक टिममधील सदस्यांना धन्यवाद देऊ इच्छितो.

- आर. व्ही. शेषन, सीईओ-जीजीआयएल.

माल वाहतूक (कार्गो)ः

जानेवारी २०२३ पासून माल वाहतूक सेवेस प्रारंभ झाल्यापासून एमआयए गोव्यातील आर्थिक वृध्दीचे एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. ही सेवा वैविध्यपूर्ण अशी आहे, जी औषधांपासून ते भाज्या अशा विविध प्रकारात आहे.

त्यासाठी तापमान नियंत्रित कार्गो टर्मिनल सुविधेचा समावेश असून या कार्गो टर्मिनलमध्ये पहिल्या ११ महिन्यांमध्ये ७५० मेट्रिक टन एवढ्या मालाची प्रक्रिया केली आहे. एमआयए केवळ एक विमानतळ नसून वृध्दी, नावीन्य आणि जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव उपलब्ध करण्याची वचनबध्दता यांचे ते एक प्रतीक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com