पेडणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाप्रमाणे मोपा पिडीत शेतकऱ्यांना सकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोवा कुळ मुंडकार संघर्ष समितीचे समन्वयक दिपेश नाईक यांनी दैनिक " गोमंतक " शी बोलताना केली. मोपा आंतरराष्ट्रीय विमानळ पेडणे तालुक्यासाठी व कुळ, मुंडकारांच्या विकासाठी आहे, असे सरकार सांगत आहे. मोपा विमानतळ तालुक्यासाठी वरदान ठरणार असे येथील शेतकऱ्यांना वाटत होते म्हणून आपल्या पूर्वजांनी कष्ट करून आपल्या पुढील पीढीसाठी संभाळून ठेवलेल्या जमीनी विमानतळासाठी स्वखुशीने दिल्या. (Mopa Airport Upadate)
पण कुळ-मुंड कारांच्या या त्यागाचे या सरकारला काहीही देणे घेणे नाही. असे आतापर्यंत सरकार शेतकऱ्यांशी वागत असलेल्या उध्दटपणाच्या वर्तणुकीवरुन जाणवत आहे. कुळ मुंडकारांच्या दृष्टीने हे विमानतळ म्हणजे एक श्राप ठरत आहे. येत्या 15 ऑगष्ट रोजी पहिले विमान मोपा विमानतळावरून उड्ढाण घेणार असल्याचे सरकारतर्फे जाहिर करण्यात आले आहे.
या विमानतळासाठी ज्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या त्यांना प्रशिक्षण देऊन नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येईल असे याबाबत भूलथापा मारून स्थानीकांची थट्टा करत आहे. कारण स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने प्रशिक्षण देण्याची सोय केलेली नाही व त्याबद्दल माहिती सरकार स्थानिकांना देत नाही. कुळ मुंडकारांची मोपा विमानतळ प्रकल्पासाठी 90 लाख चौरस मीटर जागा संपादित करण्यात आलेली आहे. यातील 10 टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. उर्वरीत 90 टक्के शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत.
खरतर नवी मुंबई येथे सिडकोने बांधलेला आंतराष्ट्रीय विमाळावर तेथील शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे नुकसान भरपाईचे स्पेशल पॅकेज देण्यात आले. त्यामधे जमीनीच्या बदल्यात जमिन, आजीवन रॉयल्टी, प्रशिक्षण देऊन तेथेच नोकरी, ज्यांची घरे पाडली त्यांचे पुनर्वसन इत्यादी सोई सुविधा तेथील जमीन गेलेल्या लोकांना दिल्या.
तो प्रकल्प सुद्धा केंद्र सरकारचाच आणि गोव्यातील आंतराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प सुद्धा केंद्राचाच नवी मुंबईतील लोकांना ज्या सोई - सुविधा दिल्या, तशाच मोपा पिडीत शेतकऱ्यांनाही सगळ्या सोइ सुविधा व त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. पेडण्याचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या कुळ मुंडकारांच्या गंभीर समस्येकडे जातीनिशी लक्ष देवून नवी मुंबईत सिडकोने जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून द्यावा असे कुळ मुंडकार संघर्ष समिती समव्यक्त दिपेश नाईक हे यावेळी बोलताना म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.