राज्यात 8 जूनपर्यंत मध्यम पाऊस बरसणार

मॉन्सूनचे आगमन लांबले : तापमान घटण्याचे संकेत
Monsoon Updates
Monsoon UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात येत्या 8 जूनपर्यंत काही भागांत मध्यम ते तुरळक पाऊस बरसण्याची शक्यता हवमान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे. मात्र, राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबले आहे.यंदा केरळमध्ये 27 मे रोजी मॉन्सूनचे आगमन झाले.

(monsoon rains till June 8 in goa)

Monsoon Updates
कच्च्या तेलाचे दर भिडले गगनाला जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलची स्थिती

त्यामुळे गोव्यात 2 जूनपर्यंत मॉन्सून येण्याची शक्यता होती. अनेक वैज्ञानिकांनी तसा अंदाजही वर्तविला होता. मात्र, वातावरणातील बदलांमुळे मॉन्सूनचे आगमन लांबण्याची चिन्हे आहेत. शनिवारी दिवसभर राज्यात ऊन पडले होते. पाऊस पडण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. पणजी वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल यांनी मॉन्सूनविषयी सांगितले, की मॉन्सून केरळमध्ये लवकर आला म्हणजे गोव्यात देखील लवकरच येईल, असे काही नसते.

Monsoon Updates
कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी गोवा सज्ज!

मॉन्सूनचा प्रवास विविध घटकांवर आधारित असतो. पुढील 3 ते 4 दिवसांत राज्यात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता कमीच असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील दोन दिवस तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आज पणजी येथे कमाल तापमान 34.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26.6 अंश सेल्सिअस होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com