IMD Monsoon Update: एका आठवड्याच्या विलंबानंतर मॉन्सून अखेर केरळमध्ये दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ पुढील 48 तासात आणखी तीव्र होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Monsoon Starts in Kerala)
माहितीनुसार, केरळमधील अनेक भागात जोरदार पावसाने आपली हजेरी लावली असून उष्म्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता लवकरच मॉन्सून सरी गोव्यातही बरसणार आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे केरळमध्ये मॉन्सून 16 जूननंतर दाखल होईल असे सांगण्यात येत होते. यादरम्यान हवामानात मोठ्या प्रमाणात बदलही झाले होते. मात्र मॉन्सून सरींनी केरळमध्ये आगमन केल्याने आता इतर राज्यांमध्येही लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाचा अजून गोव्याला फटका बसला नसला तरी त्याचा परिणाम समुद्र किनाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. पाण्याची पातळी वाढली असून समुद्राने रौद्र रूप धारण केल्याचे चित्र आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.