Margao Municipal Council: कोणाला तरी ‘ते’ पैसे भरावेच लागतील : शिरोडकर
Margao Municipal Council Money Theft Case: मडगाव नगरपालिकेतून 17 एप्रिल 2023 रोजी 50 हजार रुपये चोरीला गेले होते. ही रक्कम नेमकी कोणी चोरली याचा थांगपत्ता पाच महिन्यांनंतरही लागत नाही.
यासंदर्भात बोलताना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की हा जनतेचा पैसा आहे व तो कोणालातरी भरावाच लागेल.
आपण मुख्याधिकाऱ्यांना अधिकृतपणे या चोरीचा तपास करायला सांगितले असून ज्या कोणा कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे ही रक्कम चोरीस गेली आहे, त्याच्याकडून ती वसूल करून घेतली जाईल.
आम्ही आमच्या परीने चौकशी केली आहे. पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून एक व्यक्ती दिसत आहे.
पण तो नेमका कोण हे कळत नाही. नगरपालिकेतील सर्व सीसीटीव्ही दुरुस्त करून कार्यान्वित केले जातील, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.
आमोणकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र
मडगाव नगरपालिकेच्या सोपो वसुलीचे जे ५० हजार रुपये चोरीला गेले होते, ती रक्कम आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवणारा मार्केट निरीक्षक महेश वेळीप याच्याकडून वसूल करावी, अशी मागणी सोमवारी (ता.११) नगरसेवक महेश आमोणकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र सादर करून केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.