Moga: मोगा वाढवतोय उत्साह; युवकही पडतायेत प्रेमात!

स्पर्धेचा शुभंकर : महाविद्यालयांसह विविध ठिकाणी भेट, स्पर्धेची जनजागृती मोहीम
MOGA ignites the spirit of National Games
MOGA ignites the spirit of National GamesDainik Gomantak

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर असलेला ‘मोगा’ आता रस्त्यावर उतरुन स्पर्धेबाबत जनजागृती करु लागला आहे. ‘खेळा आणि फिट रहा’, असा संदेश देत तो युवकांमध्ये जात आहे. युवकांमध्येही आता मोगाचे प्रचंड आकर्षण वाढत असून त्याच्या भेटीनंतर तेही त्याच्या प्रेमात पडू लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ‘मोगा’ ने विविध स्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली असून तो पणजीसह राज्यातील विविध नामांकित कॉलेजमध्ये जात आहे. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे.

अत्यंत उत्साही असलेल्या मोगाच्या भेटीनंतर तरुणाइ जाम खुश होत आहे. खेळांबाबत जनजागृतीच्या या मोहीमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोगा काही विद्यार्थ्यांना स्पर्धेबाबत प्रश्नही विचारताना दिसतो. त्याची उत्तरे दिल्यानंतर मोगा विद्यार्थ्यांचे स्वागत करतो.

MOGA ignites the spirit of National Games
Bicholim Municipality :थकबाकी वसुलीसाठी मोहीम ; डिचोली पालिकेचा निर्णय

सेल्फीची उत्सुकता

  • मोगाने काही दिवसांपूर्वी पणजीतील डॉन बॉस्को उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील मुलांची भेट घेतली होती. त्याच्या भेटीमुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. टाळ्यांच्या कडकडाटात मुलांनी आपल्या या शुभंकराचे स्वागत केले होते.

  • मुलांनी ‘सेल्फी’साठी आग्रह केल्यानंतर ‘मोगा’ने त्यांच्या विनंतीला मान देत त्यांच्यासोबत ‘सेल्फी’ काढल्या. आता ज्याही भागात ‘मोगा’ जातोय त्या ठिकाणी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह युवकांना आवरता येत नाही. त्यामुळे मोगा आता अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरु लागला आहे.

  • डॉन बॉस्का येथील शौनक पैंगीणकर या विद्यार्थ्याने सांगितले की, ‘मोगा’ हा भारतीय गवा रेड्याचे दर्शन घडवणारा शुभंकर आहे.

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा चेहरा असलेला मोगा राज्यभर फिरून विविध शाळांमधील विद्यार्थ्यांशी भावनिक नाते निर्माण करीत आहे. खेळांची चर्चा निर्माण करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्याला भेटल्यानंतर आनंद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com