
Modified Bike Seized Goa Porvorim
पर्वरी: ‘धूम स्टाईल’ दुचाकीस्वारांना वेसण घालण्यासाठी राज्यात पोलिसांनी ‘मॉडिफाईड सायलेन्सर’ असणाऱ्या दुचाकींवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. पर्वरी पोलिसांनी रेईश-मागूश व नेरुल पंचायत क्षेत्रातून चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींमुळे समाजातील अनेक घटकांना त्रास होतो. ज्येष्ठ लोक आणि रुग्णांना तर खूपच त्रास होतो. त्यासाठी अशा दुचाकीचालकांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्यभर मोहीम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात ‘मॉडिफाईड सायलेन्सर’ बसवून देणाऱ्या मेकॅनिकवर कारवाई केल्याचीही उदाहरणे आहेत.
दरम्यान, पोलिसांनी कारवाई करण्यासोबतच शोधमोहीम कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींमुळे त्रास सहन करावा लागतो. त्यांचा जीव धोक्यात येतो. ‘मॉडिफाईड सायलेन्सर’मुळे वेगाने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीस चालना मिळते. पोलिसांनी ‘मॉडिफाईड’ दुचाकींवरील कारवाईत सातत्य राखावे, अशीही मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.