गोव्यातील राजकीय परिणामांच्या भीतीमुळे मोदी म्हादई प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी देईनात; कर्नाटकचे मुख्यमंत्री

Mhadei River Dispute: प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यासाठी मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना अनेकवेळा आवाहने करण्यात आली आहेत आणि पत्रे लिहिली आहेत.
Mhadei River Water Dispute
karnataka cm | PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

बंगळुरू: गोव्यातील राजकीय परिणामांच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हादई प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी देण्यास नकार देत आहेत, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

रविवारी हुबळी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्य सरकार म्हादई प्रकल्प हाती घेण्यास तयार आहे; परंतु त्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. मात्र, केंद्राने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यासाठी मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना अनेकवेळा आवाहने करण्यात आली आहेत आणि पत्रे लिहिली आहेत.

Mhadei River Water Dispute
गोवा, बँकॉकचे स्वप्न दाखवून भोळ्या भाबड्या वृद्धांची फसवणूक; 35 लाख उकळले, 10 वर्षानंतर महिलेला अटक

कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना ही मंजुरी मिळवून देण्यात मदत करता आली असती. त्याऐवजी, ते राज्य सरकारला दोष देण्यात वेळ घालवत आहेत आणि म्हादई मुद्द्यावर मौन बाळगत आहेत. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यावर, आम्ही ताबडतोब काम सुरू करू. राज्यातील काँग्रेस सरकार २० मे रोजी सत्तेची दोन वर्षे पूर्ण करेल. आम्ही विजयनगर जिल्ह्यात या निमित्ताने जाहीर सभा आयोजित करणार आहोत.

Mhadei River Water Dispute
Petrol Diesel Prices In Goa: गोव्यात CNG एक रुपयांनी महागला; पेट्रोल - डिझेलचे दर काय आहेत वाचा

‘म्हादई’ बाबत सरकार अपयशी; निर्मला सावंत

म्हादई'बाबत सरकारची भूमिका राज्याच्या विरोधी असल्याचा आरोप म्हादई बचाव अभियानाच्या संयोजक आणि माजी मंत्री निर्मला सावंत यांनी केला. प्रवाह समितीच्या बैठकीत गोव्याचे हित पाहिले गेले नाही, त्यामुळे म्हादईच्या संरक्षणासाठी त्वरित सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.Mhadei River dispute 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Tiger Killing
Oppose Mega Projects Goa
Goa University Integrated Programmes
Goa Karnataka Border Conflict 2026:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com