'मोदी सरकारचे धोरणे देशाच्या एकात्मेसाठी धोकादायक'!

भारताच्या प्रगतीसाठी व जगातील मान मर्यादेत वाढ होण्यासाठी केंद्रात धर्मनिरपेक्ष सरकारची अत्यंत आवश्यकता असल्याचेही डॉ. खैरनार यानी शेवटी सांगितले.
डॉ. सुरेश खैरनार
डॉ. सुरेश खैरनारDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: जागतिक परिस्थिती भारतापेक्षा वेगळी आहे असे म्हणता येत नाही. कोरोनामुळे (Covid 19) आर्थिक, आरोग्य, सामाजीक व इतर क्षेत्रासंबंधीचे जगाचे कंबरडे मोडलेले आहे. या आसमानी आपत्तीमुळे सर्वत्र गोंधळाचे व भितीचे वातावरण पसरले. पणे गेल्या पावणे आठ वर्षांत भारतात ज्या पक्षाचे सरकार आहे व त्यांच्या ध्येय धोरणाचे निरिक्षण केले तर भारताच्या एकात्मतेला एका प्रकारे धोकादायकच आहे असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष तथा इंडिया पेलेस्टीन सोलिडेरिटी फोरमचे अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यानी प्रतिपादन केले.

राष्ट्रीय कॉन्फेडरेशन ऑफ हयुमन राईट (NCHR) संघटनेच्या गोवा शाखेने मडगावी आयोजित केलेल्या भारतातील व विदेशातील सद्य स्थिथी या विषयावरील भाषणा पुर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.

भारतात एका विशिष्ट धर्माची (religion) तत्वे बाळगलेले सरकार सत्तेवर असणे ही चांगली स्थिती नाही. एका विशिष्ट संस्थेला किंवा समाजाला लक्ष्य करणे योग्य नव्हे. भारतात 35 कोटी अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्या रक्षणासाठी सरकारची ध्येय धोरणे केवळ दिखावा आहे हे अनेक घटनांमधुन स्पष्ट होत आहे.

डॉ. सुरेश खैरनार
Goa: राज्यात मिरीचे उत्पादन घटणार

कोरोनाच्या काळातही सरकारने अनेक गोष्टी लपवल्या आहेत. भारतात 40 ते 45 लाख लोक मृत्युमुखी पडले असावेत. मात्र ही माहिती सरकारने लपवली असल्याचेही डॉ. खैरनार म्हणाले.

आजचे सरकार जातीयवाद, सांप्रदायवाद यावर आधारीत आहे व भारतीय घटनेतील मुलभुत हक्कांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे डॉ. खैरनार यानी सांगितले. हे सरकार ज्या प्रकारे प्रांत, भाषा व धर्म यामध्ये भेदभाव करते व अपप्रचार करते हे संशयास्पद आहे असेही ते म्हणाले. लोकचळवळींना बंद व अपशकुन करण्याचे सरकारचे धोरण चिंताजनक आहे. शिक्षण, आरोग्य तसेच संरक्षण लोकचळवळींना बंद व अपशकुन करण्याचे सरकारचे धोरण चिंताजनक आहे. शिक्षण, आरोग्य तसेच संरक्षण (Education, health and protection) क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करणे हे देशाच्या सुरक्षिततेच्या नजरेने धोकादायक आहे. ही देशभक्ती नव्हे तर देशद्रोह आहे अशा कडक शब्दात डॉ. खैरनार यानी सरकारी धोरणांचा समाचार घेतला.

भारताच्या प्रगतीसाठी व जगातील मान मर्यादेत वाढ होण्यासाठी केंद्रात धर्मनिरपेक्ष सरकारची अत्यंत आवश्यकता असल्याचेही डॉ. खैरनार (Dr. Khairnar) यानी शेवटी सांगितले.

डॉ. खैरनार सद्या गोव्यात आहेत व दक्षिणायन कचेरीत, रवीन्द्र केळेकर ज्ञान मंदिरात त्यानी आपले विचार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com