Margao: औषध घेण्यासाठी आला, मोबाईल घेऊन पळाला; मडगाव येथील घटना, केरळच्या तरुणाला अटक

Margao Pharmecy Mobile Theft: गिऱ्हाईक म्हणून आलेल्या एका भामट्याने मडगावच्या एका फार्मसीच्या मालकाला ‘हात की सफाई’ दाखविताना, त्याचा एक मोबाईल पळवून नेण्याची घटना घडली.
Mobile Theft Goa
Mobile Theft MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गिऱ्हाईक म्हणून आलेल्या एका भामट्याने मडगावच्या एका फार्मसीच्या मालकाला ‘हात की सफाई’ दाखविताना, त्याचा एक मोबाईल पळवून नेण्याची घटना घडली.

या प्रकरणी नंतर त्या फार्मसीच्या मालकाने मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शिताफीने तपास करून, संशयिताच्या मुसक्या आवळल्या. सुजित सुनील पी. एस (२५) असे या संशयिताचे नाव असून, तो मूळ केरळ राज्यातील एर्नाकुलम येथील आहे.

त्याच्याकडे दोन चोरीचे मोबाईल सापडले असून, त्यातील एक त्याने पर्वरी येथून चोरला होता. पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रणजितकुमार देसाई यांनी या प्रकरणाचा छडा लावताना, संशयिताला मडगावच्या रेल्वे स्थानकाजवळ जेरबंद केले.

Mobile Theft Goa
Sawantwadi Theft: चोरट्यांचा धुमाकूळ! गोव्यात टॅक्सीचालकावर खुनी हल्ला, सावंतवाडीत घरफोडीसह दुचाकी-मोबाईलची चोरी

परवा बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान चोरीची वरील घटना शहरातील मालभाट येथील जामा मशीद येथे घडली. संजय हारुगेरी हे तक्रारदार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची फार्मसी आहे. संशयित तेथे औषध घेण्यासाठी प्रिस्क्रिप्‍शन घेऊन आला होता.

Mobile Theft Goa
Sanquelim Temple Theft: साखळी देवस्‍थानात चोरी नाहीच! शास्त्रानुसार मुर्त्या विसर्जित; पदाधिकाऱ्यांचे मामलेदारांवर आरोप

दुकान मालकाचे लक्ष नसल्याचे पाहून एक मोबाईल चोरून हळूच तो पसार झाला. आपला मोबाईल चोरीला गेल्याचे आढळून आल्यानंतर हारुगेरी यांनी पोलिसांत तक्रार केली. संशयिताचे अन्य साथीदार असावेत असा पोलिसांचा कयास असून, पुढील चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com