Goa Crime News: राज्यात मोकाट चोरांचा सुळसुळाट! चक्क हॉटेलच्या खोलीतून मोबाईल, कॅमेरे चोरीला

जुना येथील हॉटेलच्या खोलीतून एका पर्यटकाचा सुमारे 8 लाख रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, कॅमेरे आणि त्याचे सामान चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अंजुना येथील हॉटेलच्या खोलीतून एका पर्यटकाचा सुमारे 8 लाख रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, कॅमेरे आणि त्याचे सामान चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी घडली होती आणि 2 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

(Mobile phones and cameras were stolen from hotel room in goa)

Goa Crime
Goa Petrol Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपी मधील प्रद्युमन घाटोडिया यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीचा संदर्भ देताना, पोलिसांनी सांगितले की, काही गुन्हेगारांनी तक्रारदाराच्या खोलीत दरवाजा उघडून प्रवेश केला आणि फोन आणि कॅमेरे इतर विविध उपकरणे असलेली बॅग हिसकावून घेतली, ज्याची किंमत `8 लाख आहे. याप्रकरणी अंजुना पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

परप्रांतीयच नव्हे, तर स्थानिकांचाही सहभाग

11 सप्टेंबर रोजी सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याने रेस्टॉरंटमधील रोकड व स्कूटर मिळून 1.40 लाखांचा मुद्देमाल चोरला. संशयितास बंगळुरूमधून अटक केली. हा संशयितही रेस्टॉरंटमध्ये कामाला होता.

कळंगुट पोलिसांनी ऑगस्टमध्ये बागा येथील वाहनतळावरील कारमधील मोबाईल लंपास केल्याप्रकरणी चौघांना अटक केली होती. चोरीचा ऐवज पर्यटकाचा होता. हे संशयित कळंगुटचे रहिवासी असले तरी मूळचे गदग-कर्नाटकमधील होते.

Goa Crime
PM नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार 'मोपा'चं उद्घाटन; जमीन भरपाईबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती

म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत चोरी !

ऑगस्टमध्ये म्हापसा पोलिसांनी मडगाव येथील एका हिस्ट्रीशिटर आरोपीस अटक केली होती. संशयिताने हळदोणामध्ये तीन दुचाकींच्या डिकीमधील मोबाईल तसेच रोकड लंपास केली होती. ही घटना चर्चच्या पार्किंग तळावर घडली होती. याप्रकरणी अन्सर नारंगी या संशयिताला अटक झाली होती. अलीकडेच म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका नामांकित क्लिनिकमध्ये चोरी झाली होती.

अल्पवयीनांचाही चोरी प्रकरणांमध्ये सहभाग

म्हापसा पोलिसांनी ऑगस्टमध्ये आराडी-पर्रा येथील 15 लाखांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावला. म्हापसा पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. यातील तिघे अल्पवयीन होते, तर ज्युएल शेख (22) याला अटक केली होती. हा कळंगुटचा रहिवासी असला तरी तो मूळचा पश्चिम बंगालचा. संशयितांनी बंगल्यामधून लेन्स, कॅमेरा, आयपॉड, मोबाईल संच चोरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com