VIDEO: गोमंतकीयांना 'दुहेरी नागरिकत्व' द्या! आमदार सरदेसाईंचं PM मोदींना पत्र; पासपोर्टच्या जाचातून मिळणार मुक्तता?

Dual Citizenship For Goans: आमदार विजय सरदेसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परदेशात काम करणाऱ्या गोमंतकीयांसाठी 'दुहेरी नागरिकत्व' (Dual Citizenship) देण्याची मागणी केली.
mla vijai sardesai  and pm modi
mla vijai sardesai and pm modiDainik Gomantak
Published on
Updated on

Sardesai Letter to PM Modi : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परदेशात काम करणाऱ्या गोमंतकीयांसाठी 'दुहेरी नागरिकत्व' (Dual Citizenship) देण्याची मागणी केली. या पत्राद्वारे त्यांनी गोव्यातील नागरिकांच्या अस्मितेचा आणि त्यांच्या पासपोर्ट संदर्भात निर्माण झालेल्या गंभीर समस्यांचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला.

सरदेसाई यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, प्रजासत्ताक दिनी जागतिक स्तरावर गोव्याची ओळख आणि संस्कृती मोठ्या अभिमानाने साजरी केली जाते, मात्र दुसरीकडे गोव्यातील अनेक नागरिकांना त्यांच्या भारतीय पासपोर्टवरुन नाहक मानसिक त्रास दिला जात आहे.

सध्याच्या नियमांनुसार, अनेक गोमंतकीय रोजगाराच्या शोधात परदेशात स्थायिक झाले असून त्यांनी तिथल्या सोयीसाठी पोर्तुगीज किंवा इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. मात्र, यामुळे त्यांना त्यांचा भारतीय पासपोर्ट सोडावा लागतो किंवा तो रद्द केला जातो. सरदेसाई यांच्या मते, गोव्यातील नागरिकांना त्यांच्या उपजीविकेसाठी आणि त्यांच्या मातृभूमीशी असलेल्या नात्यासाठी यापैकी एकाची निवड करायला लावणे अन्यायकारक आहे. परदेशात राहूनही हे नागरिक गोव्याच्या संस्कृतीशी आणि भारताशी घट्ट जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या नागरिकत्वावर होऊ नये.

mla vijai sardesai  and pm modi
Vijai Sardesai: 'मी मुख्यमंत्री झालो तर...', विजय सरदेसाईंनी केलं मोठं वक्तव्य, निवडणुकीत कोणता मुद्दा असावा हेही सांगितलं

त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली की, गोमंतकीयांच्या या विशेष परिस्थितीचा विचार करुन त्यांना दुहेरी नागरिकत्वाचा हक्क मिळावा, जेणेकरुन ते कोणत्याही भीतीशिवाय जगभरात काम करु शकतील आणि भारताचे नागरिक म्हणून आपली ओळखही टिकवून ठेवू शकतील. या मागणीमुळे आता गोव्यातील (Goa) राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com