Vijai Sardesai: प्रस्तावित महिला आरक्षण विधेयकाला विजय सरदेसाईंनी दिला पाठिंबा

Vijai Sardesai: लोकसभा, विधानसभेत वाढणार प्रतिनिधित्व
Vijai Sardesa
Vijai SardesaDainik Gomantak

Vijai Sardesai on Women Reservation: पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी देण्यात आली. आता हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे.

दरम्यान, त्यावर आता देशभरातील पक्ष, नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गोव्यातील फातोर्ड्याचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही महिला आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.

Vijai Sardesa
Goa Medical College: गोव्यात 46 रुग्णांना प्रतीक्षा अवयव दानाची; मृताच्या कुटूंबियांची संमती ठरते महत्वाची...

गोवा फॉरवर्ड पक्षाने याबाबत ट्विट केले आहे. त्यात विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे की, महिला आरक्षणाचे स्वागत आहे. निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींकडे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील जवळपास 50 टक्के मूलभूत समस्या हाताळण्याची योग्यता असेल.

दरम्यान, हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव होतील. सध्याच्या लोकसभेत 78 महिला खासदार आहेत. हे प्रमाण एकूण 543 खासदारांच्या 15 टक्क्यांहूनही कमी आहे. तर राज्यसभेतही महिलांचे प्रतिनिधित्व सुमारे 14 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com