Vijai Sardesai: गोव्यातील गरिबांचा तांदूळही कर्नाटकात पळवला; हेच का तुमचं अंत्योदय ?

गोव्यातील म्हादईचे पाणी या आधीच कर्नाटक राज्याने पळविले आता धान्य...
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील म्हादईचे पाणी आधीच कर्नाटक राज्याने पळविले, आता गोव्यातील गरिबांना मिळत असलेला तांदूळही कर्नाटक येथील व्यापाऱ्यांनी पळविला. हेच तुमचे अंत्योदय तत्व का ? असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला असून नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर करावाई करावी अशी मागणी केली आहे.

(mla vijai sardesai demand action against those guilty in ration scam)

Vijay Sardesai
Goa coastal: राज्याच्या किनारी सुरक्षेला येणार बळकटी; नौदल, तटरक्षक दलाचा संयुक्त सराव सुरु

रवी नाईक हे खणखर वृत्तीचे मंत्री आहेत. ते गृहमंत्री असताना त्यांनी अनेक गुंडावर जरब बसविली. तसाच धडाका त्यांनी यावेळी दाखवावा. या प्रकरणात कोण सामील आहे? त्यांच्यावर कारवाई करावी. मग तो कोण ही असेना का? त्याची गय करू नये असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Vijay Sardesai
Vijai Sardesai on Ration Scam : गोव्यात लुटारुंसाठी 'All is Well'; धान्य घोटाळ्यावरुन सरदेसाईंची बोचरी टीका

गतवेळी जो तूरडाळ घोटाळा झाला होता, त्यावेळी मी आवाज उठवून पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहून कारवाई करावी अशी मागणी केली होती. पण त्याचे काहीच झाले नाही. उलट माजी नागरी पुरवठा खात्याचे संचालक सिद्धिविनायक नाईक यांना बळीचा बकरा बनविण्यात आले. आता संजीत रॉड्रिग्ज यांनी ही कारवाई केली म्हणून त्यांच्यावर कारवाई करू नये एव्हढीच अपेक्षा असे सरदेसाई यांनी उपरोधिकपणे म्हटलें आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com