Goa Assembly Monsoon Session 2023 : रेल्वे दुपदरीकरणाचे विधानसभेत पडसाद; विरोधक आक्रमक

वारसा वास्तूला धक्का न लावता होणार लोहमार्ग : मुख्यमंत्री डॉ. सावंत
vijai sardesai
vijai sardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Railway Double Tracking For Coal Transportation : लोहमार्ग दुपदरीकरणाचा प्रकल्प रद्द करा, अशी जोरदार मागणी आज विधानसभेत करण्यात आली. आमदार विजय सरदेसाई यांनी याविषयी प्रश्न विचारला. अखेर कोणत्याही वारसा वास्तूला धक्का न लावता लोहमार्ग दुपदरीकरण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

आम्हाला कोळसा नको या विरोधकांच्या सुरात मुख्यमंत्र्यांनीही आपला सूर मिसळला. दक्षिण पश्चिम रेल्वे कडून राबवण्यात येणाऱ्या लोहमार्ग दुपदरीकरणाला स्थानिकांचा विरोध असून त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.

vijai sardesai
पावसात कोसळलेले घर पुन्हा उभं करणार ; सभापती तवडकरांनी आमदारांना केले महत्वाचे आवाहन

मंत्री नीलेश काब्राल यांनी हा विषय गंभीर असल्याचे म्हटले होते. असे असतानाही सरकार हा प्रकल्प का पुढे नेऊ पाहत आहे अशी विचारणा सरदेसार्ई यांनी केली. त्यांनी हा प्रकल्प नको, अशी सरळ मागणी केली.

आमदार कार्लोस फेरेरा यांनीही जर घाट भागामध्ये लोहमार्ग दुपदरीकरणासाठी परवानगी मिळणार नसेल तर मग सखल भागामध्ये तरी लोहमार्ग दुपदरीकरण का करता, अशी विचारणा केली. आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी आरोशी, वेळसाव, पाळे भागातील भूवापर नोंदीचे नकाशे का गायब करण्यात आले, अशी विचारणा केली.

vijai sardesai
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 15: GST, VAT, सोसायटी नोंदणी दुरूस्ती विधेयक आणि वीज खात्याच्या मागण्या व कपात सूचना - आजचा रिपोर्ट

सरकारला कोंडी पकडण्याचा प्रयत्न

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी संपादित जमिनीत कोणतीही वास्तू जाणार नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र हे दुपदरीकरण का हवे यावर विरोधक ठाम राहिले.

आमदार विजय सरदेसाई यांनी सर्वोच्च न्यायालयातील निवाड्याचा हवाला देत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्र्यांनी कोणतीही वारसा वास्तू न पडता लोहमार्ग दुपदरीकरण करू, असे आश्वासन देत हा विषय संपवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com