Primary School : माध्यान्ह आहारातील पुलावातून ‘भाजी’च गायब! विठ्ठलापूर शाळेतील प्रकार

आमदार प्रेमेंद्र शेट व मुख्याध्यापिकेसह इतरांना पुलावाचा आस्वाद घेण्यास सांगितले, त्यावेळी अशा प्रकारच्या पुलावाबाबत संबंधितांनी नाराजी व्यक्त केली.
Premendra Vishnu Shet
Premendra Vishnu ShetDainik Gomantak

Primary School : साखळी, विठ्ठलापूर-कारापूर शाळेत मध्यान्ह आहारात आज शाळेत देण्यात आलेल्या पुलावात कोण्याही प्रकारची भाजीच नव्हती, आमदार प्रेमेंद्र शेट व मुख्याध्यापिकेसह इतरांना पुलावाचा आस्वाद घेण्यास सांगितले, त्यावेळी अशा प्रकारच्या पुलावाबाबत संबंधितांनी नाराजी व्यक्त केली.

आमदारांनी पुलावाचा दर्जा वाढविण्यासाठी मध्यान्ह आहार पुरवठादाराला पत्र लिहिण्याची मुख्याध्यापिकेला सूचना केली. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आज सोमवारी सकाळी अचानक भेट देऊन विविध विषयांची जाणीव करून घेतली.

राज्यातील एक मोठी शाळा असलेल्या विठ्ठलापूर-कारापूर, साखळीतील या शाळेत अनेक समस्या असल्याची कैफियत आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याकडे मांडली.

शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना गावस, पालक- शिक्षक संघाचे अध्यक्ष वर्धमान शेंदुरे, विश्रांती गावकर, पालक सिध्देश काणेकर, उज्वल हळर्णकर इत्यादी मंडळी उपस्थित होती.

मध्यान्ह आहारात देण्यात येणाऱ्या पदार्थांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. आज देण्यात आलेल्या पुलावात वापरण्यात आलेला तांदूळही कमी दर्जाचा होता.

मध्यान्ह आहारात देण्यात येणाऱ्या पदार्थांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. आज देण्यात आलेल्या पुलावात वापरण्यात आलेला तांदूळही कमी दर्जाचा होता.

सफाई कर्मचारी हवे!

शाळेची इमारत मोठी असल्याने या शाळेची साफसफाई व इतर कामांसाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग सरकारकडून अद्याप पुरविण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या शिक्षकांसमोर मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी सरकारदरबारी आपला पाठपुरावा चालूच आहे.

Premendra Vishnu Shet
Panaji News : ''सम्राट क्लब'' पर्वरीचा गरुडा सन्मानाने गौरव

याबाबत आता पुन्हा शिक्षण खात्याकडे पाठपुरावा करणार, असे आमदार शेट यांनी सांगितले.

जलशुद्धीकरण टाकी

शाळेला नेस्ले कंपनीकडून सामाजिक जबाबदारी योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण टाकी देण्यात येणार आहे. त्याबाबतचे काम सुरू असून या कामाचीही पाहणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली. या पाण्याच्या टाकीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com