Panaji News : ''सम्राट क्लब'' पर्वरीचा गरुडा सन्मानाने गौरव

त्याचबरोबर पर्वरी येथे नोमोझो कार्यक्रमात पारंपरिक गाव आणि सांस्कृतिक कार्यक्रम या उपक्रमास प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.
Samrat Club
Samrat ClubDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, सम्राट क्लब राज्य इंटरनॅशनल -१ चा वार्षिक गरुडा सन्मान सोहळ्यात सम्राट क्लब पर्वरीचा गरुडा सन्मानाने गौरव करण्यात आला. सिनेतारका वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. साखळी येथील रवींद्र भवनमध्ये पार पडला.

वर्षभरातील एकंदर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य इंटरनॅशनल -१ या पुरस्कारांनी सम्राट क्लबच्या सदस्यांचा आणि उत्कृष्ट अशा तीन क्लबचा दरवर्षी सन्मान करते. राज्यात एकूण ३६ सम्राट क्लब अस्तित्वात आहेत.

त्यातील जवळजवळ २९ क्लब हे सक्रिय कार्यरत आहेत. यामध्ये राज्यस्तरीय स्थरावर सम्राट क्लब पर्वरीने तृतीय क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर पर्वरी येथे नोमोझो कार्यक्रमात पारंपरिक गाव आणि सांस्कृतिक कार्यक्रम या उपक्रमास प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.

गेली सहा वर्ष पर्वरी येथील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे असे योगदान सम्राट क्लब पर्वरी देत आहे. या वर्षी राजमोहन शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण असे कार्यक्रम संस्थेने घडवून आणले.

अध्यक्ष शेट्ये, संचालक मंडळ आणि सदस्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी सम्राट क्लब राज्य इंटरनॅशनल राज्य अध्यक्ष शैलेश बोरकर, खजिनदार सूरज नाईक, गोकुळदास कुडाळकर आदी उपस्थित होते.

सम्राट पर्वरीच्या या यशाबद्दल स्थानिक आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यांनी विशेष कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com