Aldona News : भूमिगत वीज वाहिन्यांचा मूळ प्रस्ताव मीच केला होता सादर : ग्लेन टिकलो

प्रकल्पावरून आजी-माजी आमदारांत वाद सुरूच
threatening former Aldona MLA Glenn Ticlo | Goa Crime News
threatening former Aldona MLA Glenn Ticlo | Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

MLA Glenn Ticlo : हळदोणे मतदारसंघातील भूमिगत वीज वाहिन्यांसाठी तत्कालीन मंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे मूळ प्रस्ताव मीच सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे कधीच म्हटले नव्हते. त्या प्रस्तावावर मंत्र्यांनी मला पुढील कार्यकाळात हे काम हाती घेण्याचे आश्वासन दिले होते, अशी स्पष्टोक्ती माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी दिली.

सध्या भूमिगत केबल कामाच्या श्रेयवादावरुन टिकलो व फेरेरा यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी स्वतःहून मंजूर करून घेतलेला एकतरी प्रस्ताव दाखवण्याचे आव्हान टिकलो यांनी विद्यमान आमदारांना यावेळी दिले.

आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी भूमिगत वीज वाहिन्यांवरून केलेल्या टिप्पणीवर माध्यमांशी बोलताना वरील प्रत्युत्तर टिकलो यांनी दिले.

threatening former Aldona MLA Glenn Ticlo | Goa Crime News
Monsoon 2023 : माॅन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर; कारवारमध्ये दाखल

आपण सादर केलेला मूळ प्रस्ताव लवकरच मी सादर करणार असेही ग्लेन टिकलो म्हणाले. त्यामुळे आमदारांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. या मूळ प्रस्तावाचा पाठपुरवठा करण्यास आपण नव्हतो, मात्र हळदोणेतील सर्व सहा पंचायतींमध्ये ११केव्ही भूमिगत वीज वाहिन्यांसाठी प्रस्ताव सादर केलेला.

मी आमदारांवर टीका करीत नाही, पण त्यांनी स्वतःहून मंजूर करुन घेतलेला एक तरी प्रस्ताव सादर करावा असेही ते म्हणाले. मुळात फेरेरा यांनी मूळ विषयास बगल देऊन भलतेच मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्याची टीका टिकलो यांनी केली.

हळदोणचा विकास हवा

आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी 97 कोटी रुपये भूमिगत वीज वाहिन्यांसाठी मंजूर झाल्याची माहिती दिली, त्यावेळी मला आनंद झाला. आपल्यालाही हळदोणेचा विकास हवा आहे. हळदोणामध्ये विजेची मोठी समस्या असल्याचेही टिकलो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com