MLA Divya Rane: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशामध्ये उत्साही माहोल

मतदारसंघांमध्ये तिरंगा मिरवणूकीला चांगला प्रतिसाद
Divya Rane
Divya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: स्वतंत्रानंतर भारताने झपाट्याने विकास केलेला आहे. या विकासाच्या प्रवाहामध्ये प्रत्येक भारतीयांनी सहभाग दर्शविलेला आहे. अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी आपल्यापरीने योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आज भारतामध्ये झपाट्याने प्रगती होऊ लागलेली आहे.

(MLA Divya Rane says good response to Tiranga procession in PORIEM constituencies )

Divya Rane
पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

स्वच्छता मोहीम, गरीब कल्याण योजना, तिहेरी तलाक असे धाडसी निर्णय घेऊन भारताने जगाला एक वेगळ्याच प्रकारचा आदर्श निर्माण करून दिला आहे. जगामध्ये भारताची लोकशाही प्रगल्प मानली जात आहे‌. ही लोकशाही आणखीन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांनी आपल्यापरीने सहभाग दर्शवावा अशा प्रकारची आवाहन पर्ये मतदार संघाचे आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले आहे.

Divya Rane
75th Indian Independence Day: वाळपई जिल्‍हाधिकारी कार्यालयात उत्साहात

पर्ये मतदार संघातील तिरंगा मिरवणुकीत समारोप सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. ठाणे येथील पंचायत मैदानावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध पंचायतीचे नवनिर्वाचित पंच सभासद, जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर व इतरांची खास उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले की भारतात स्वतंत्र प्रथमच देशांमध्ये उत्साही माहोल तयार होऊ लागलेला आहे. केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेतल्यामुळे प्रत्येकाला या सरकार बद्दल आत्मियता निर्माण होऊ लागलेली आहे. येणाऱ्या काळात झपाट्याने विकासाची प्रगती पुढे जायची असेल तर प्रत्येकाने आपल्यापरीने योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे.

तरुण पिढीने आपल्या कौशल्याला वाट मोकळी करून देताना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी करावी अशा प्रकारचे आवाहन यावेळी त्यांनी केले. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिकदृष्ट्या चांगल्या प्रकारच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न जाहीर झालेले आहेत.

गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात धाडसी निर्णय घेऊन गोवेकराना चांगल्या प्रकारचे प्रशासन देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करीत आहे. सतरी तालुक्यातील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे .यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन डॉ. राणे यांनी केले.

दरम्यान मतदार संघाच्या या मिरवणुकीला केरी सत्तरीतून सुरुवात करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी दुचाकी वाहने घेऊन भाग घेतला होता. सदर मिरवणूक केरी भागातून त्यानंतर मोर्ले होंडा, पिसुर्ले, भिरोंडा, होंडा वाळपई कोपर्डे व त्यानंतर ठाणे या ठिकाणी या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com