Shri Lairai Devi Temple: लईराई देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! विश्रांती गृहाची होणार व्यवस्था; अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता

Shri Lairai Devi Temple Community Hall: केळावडे रावण केरी सत्तरी येथील श्री लईराई देवीच्या भक्तांसाठी (धोंड) विद्यमान सभागृहाच्या विस्ताराचे भूमिपूजन आमदार दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या विस्तारामध्ये आसन व्यवस्था आणि स्वच्छतागृह सुविधा समाविष्ट आहेत.
Shri Lairai Devi Temple Community Hall
Shri Lairai Devi Temple Community HallDainik Gomantak
Published on
Updated on

Shri Lairai Devi Temple Community Hall

वाळपई: केळावडे रावण केरी सत्तरी येथील श्री लईराई देवीच्या भक्तांसाठी (धोंड) विद्यमान सभागृहाच्या विस्ताराचे भूमिपूजन आमदार दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या विस्तारामध्ये आसन व्यवस्था आणि स्वच्छतागृह सुविधा समाविष्ट आहेत.

भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी केरी सरपंच सुप्रिया गावस, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, उपसरपंच उस्मान सय्यद, पंच दिक्षा गावस, भिवा गावस, श्रीपाद गावस, नंदिता गावस, राजेश गावस, संदीप ताटे, तनवीर पांगम, अभियंते श्री भंडारी, फटगो गावकर तसेच ग्रामस्थ, गावकरी मंडळी व इतरांची उपस्थिती होती.

दिव्या राणे म्हणाल्या, धोंडांच्या भक्तिभावाला सन्मान देणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या नव्या सुविधेमुळे त्यांना त्यांच्या धार्मिक कर्तव्यांचे पालन सुलभपणे करता येईल. त्यांच्या मागणीची पूर्तता करून त्यांचा विश्वास जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धोंड आपल्या निष्ठेने लईरोई देवीच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण करतात.

गुढी पाडव्यापासून जत्रोत्सवाच्या समाप्तीपर्यंत मांसाहार आणि मद्यसेवनाचे त्याग करतात. या काळात त्यांनी पवित्रतेसह त्यांच्या परंपरांचे पालन करण्यासाठी संपर्क येणाऱ्या कोणत्याही अपवित्र गोष्टींना टाळावे लागते. त्यामुळे या विश्रांतीगृहाचा उपयोग धार्मिक विधी करताना स्वच्छ आणि पवित्र जागा उपलब्ध करून देण्यासाठी होणार आहे.

दरम्यान, सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिपप्रज्वलन करुन श्री लईराई मातेचा आशीर्वाद घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Shri Lairai Devi Temple Community Hall
एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

दिव्या राणेंचे आभार

पंच सदस्य संदीप ताटे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सुसज्ज अशी धोंडासाठी शेड असावी अशी मागणी जोर धरुन होती. यासंबंधीची कल्पना काही महिन्यांपूर्वीच आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन आमच्या मागणीची पुर्तता केली आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com