Margao News : दुकान चालविणाऱ्यालाच मिळणार मालकी हक्क

दिगंबर कामत : गांधी मार्केटवरून उड्डाणपुलाचा प्रस्ताव
Margao News : दुकान चालविणाऱ्यालाच मिळणार मालकी हक्क
Published on
Updated on

मडगावमधील न्यू मार्केट व गांधी मार्केटमध्ये जो दुकान चालवतो, त्यालाच मालकीहक्क देण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आज सांगितले. हा निर्णय केवळ मडगावपुरताच नसुन गोव्यातील सर्व नगरपालिकांना लागू असेल, असेही ते म्हणाले.

गांधी मार्केटमध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ कामत यांच्या हस्ते करण्यात आला. ‘पालिकेमध्ये मालकीहक्कासंदर्भात प्रकरणे चालू आहेत. जर याचा शोध करायला सुरवात केली तर तो नसता खटाटोप करुन शेवटी निर्णयाप्रत येणे कठीण होईल. त्यासाठी सरकारने जो सध्या दुकान चालवतो त्याला मालकीहक्क देण्याचा निर्णय घेतला आहे’, असे कामत यावेळी म्हणाले. याप्रसंगी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर, भाजप पदाधिकारी, अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

Margao News : दुकान चालविणाऱ्यालाच मिळणार मालकी हक्क
Goa Raj Bhavan : साहित्यिकांच्या मदतीसाठी राजभवन तत्पर : राज्यपाल पिल्लई

सर्वेक्षणाचे ८० टक्के काम पूर्ण

विधानसभा अधिवेशनात चर्चा होऊन नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडून सध्या मालकीहक्क देण्यासाठी दर ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. संचालनालय दर ठरवितात म्हटल्यावर नगरपालिकेवर जबाबदारी असणार नाही. सरकार जो दर ठरवितो तितके शुल्क भरुन दुकानदाराला दुकानाचा मालकीहक्क मिळवता येईल, असेही कामत यांनी स्पष्ट केले. सध्या न्यू मार्केट व गांधी मार्केटमध्ये दुकानदाराची यादी तयार करण्यासाठीचे ८० टक्के सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाल्याचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com