रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवणाऱ्या क्लबचे परवाने रद्द करा! आमदार दिलायला लोबोंचे पोलिसांना निर्देश

हणजूणमध्ये नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश
Action against loud music after 10pm
Action against loud music after 10pmDainik Gomantak
Published on
Updated on

Action against loud music after 10pm in Anjuna

राज्यात रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास निर्बंध असतानाही हे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. हणजूणमध्ये नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी हणजूण पोलिसांना रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Action against loud music after 10pm
Goa News Updates 20 January 2024: गोव्यातील दिवसभरातील घडामोडींचा आढावा

तसेच हणजूण पंचायतीला ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने देखील रद्द करण्यास सांगितले आहे.

काल (शुक्रवारी) आमदार लोबो यांनी याबाबत वागातोर येथील रहिवाशांची बैठक बोलावली होती. यावेळी रात्रभर रेस्टॉरंट्स आणि क्लबमधे संगीत वाजत असल्याचे तसेच याचा वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

आस्थापनांनी हॉटेलचा परवाना घेतला असून मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असेल तर त्यांच्यावर पंचायतीने कारवाई करावी, संबंधितांचा परवाना रद्द करून जागा सील करावी, असे आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले आहे.

या बैठकीला सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर, पंच दिनेश पाटील हेदेखील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com