आमदार दयानंद सोपटे सोमवारपासून प्रचाराचा करणार श्रीगणेशा!

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी 2022 च्या निवडणुकीत भाजपाचे 22 प्लस आमदार विजयी होण्यासाठी संकल्प केला आहे
MLA Dayanand Sopte
MLA Dayanand SopteDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी 2022 च्या निवडणुकीत भाजपाचे 22 प्लस आमदार विजयी होण्यासाठी संकल्प केला आहे, आणि प्रत्येक मातदार संघात भाजपा कार्यकर्त्ये भाजपा आमदार कामाला लागले. अधिकृत अजूनही निवडणुका जाहीर झाली नसली तरीही विधानसभेच्या क्रमान 1 वर असलेल्या मांद्रे मतदार संघातील भाजपा आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी सोमवार दिनांक 8 रोजी विनायकी चतुर्थीचा मुहूर्त साधून पार्से येथील श्री भगवती देवीला श्रीफळ ठेवून आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहे.

या विषयी आमदार दयानंद सोपटे यांनी माहिती देताना आपण भाजपातर्फे निवडणूक लढवत असून आगामी निवडणुकीत भाजपची उमेदवारी हि आपल्यालाच मिळणार आहे आणि आपण गेल्या पोट निवडणुकीत जी मताची आघाडी घेतली त्यात मोठी आघाडी घेवून किमान 8000 आठ हजार मताधिक्याने आपल्या मतदारांच्या सहकार्यातून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आपण गणपतीचा भक्त आहे. कोणतेही चांगले काम करताना आपण गणपतीचा मुहूर्त साधून आपल्या कार्याचा शुभारंभ करत असतो. त्याचाच भाग म्हणू आपण मांद्रे मतदार संघातून सोमवारी सकाळी 10 वाजता प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे सांगितले.

MLA Dayanand Sopte
अरविंद केजरीवालांचे गोव्यात कार्यकर्त्यांनी घोषणा देत केले स्वागत

या विषयी गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत , संघटन मंत्री सतीश धोंड यांची मान्यता घेवून आपण प्रचार करणार असल्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले. विधान सभेची निवडणूक अजूनपर्यंत अधिकृत जाहीर झाली नाही. तरीही यापूर्वी मांद्रे मतदार संघातून मगोचे संभाव्य उमेदवार जीत आरोलकर आणि पेडणेचे मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. मात्र इतर पक्षाच्या गोटात पूर्णपणे सामसूम आहे.

पार्सेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

2019 साली मांद्रे मतदार संघातून पोट निवडणूक झाली त्या निवडणुकीत भाजपाचे दयानंद सोपटे आमदार म्हणून निवडून आले. आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी आगामी 2022 च्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी हि आपल्यालाच मिळणार असा दावा करून आपल्या कार्यकार्त्याना त्यांनी कामाला लावले तेही कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हल्ली त्यांनी अनेक वेळा भाजपची उमेदवारी आपल्याला मिळणार असा दावा केला होता आणि त्याच पाश्वभूमीवर आमदार दयानंद सोपटे हे सोमवारी आपल्या प्रचाराचा श्रीफळ ठेवत असल्याने पुढील भूमिका पार्सेकर यांची काय असेल याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मागच्या वेळी मुख्यमंत्री मांद्रे दौऱ्यावर आले असता आमदार दयानंद सोपटे याना साधी कल्पना न देता मुख्यमंत्री सावंत हे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहून मार्गदर्शन केले तेव्हा पासून भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यामध्ये जीवात जीव आला होता.

MLA Dayanand Sopte
आम आदमी पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

आमदार दयानंद सोपटे यांनी आतापर्यंत पक्षाचे कार्य पुढे नेताना कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा त्याग करून जे पावूल पुढे टाकून भाजपात परतले त्यांचावर पक्ष कधीच अन्याय करणार नाही असा विश्वास आमदार सोपटे यांच्या समर्थकाना वाटतो. सोमवारी प्रचारा दरम्यान आमदार दयानंद सोपटे कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com