मोरजी : आमदार नसतांना निवडणुकीच्या (Elections) पाश्वभूमीवर अनेकजण वेगवेगळ्या घोषणा करतात , प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आणून प्रसिद्धीसाठी कसल्यातरी व्हायफाय (Wi-Fi) सेवेचे बटन दाबून उद्घाटन करतात . ती सेवा कोणाला मिळते त्याची गणिते ते केवळ मतासाठी (votes) करत असतात आणि आमदार नसतांना मोठ मोठी घोषणा करणारे उभे राहून आकाशातील चंद्रे तारे आणून देण्याची वल्गना करत आहेत, त्यामुळे मान्द्रेतील सुशिक्षित जनता कोण शहाणा आणि कोण खुळा हे जनता ठरवणार आहे , आपण कधी मतांची (votes) गणिते करून हि इन्टरनेट (Internet) सेवा सुरु केली नसून गरजवंत विद्यार्थ्यांच्या (Students) सेवेसाठी शिक्षणासाठी केल्याचे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी पार्से पंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व्हायफाय (Wi-Fi) सेवा सुरु केल्यानंतर ते बोलत होते .
20 रोजी पार्से पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरपंच प्रगती सोपटे , पंच ममता सातर्डेकर , भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब , तुये सरपंच सुहास नाईक , विर्नोडा सरपंच मंगलदास किनाळेकर, पार्से उपसरपंच अजित मोरजकर , गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंतसागर गोवेकर ,आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर ,अनंत गडेकर ,रामा नाईक , पंच शैलेंद्र परब ,सागर तिळवे , माजी सरपंच प्राजक्ता कन्नाईक आदी उपस्थित होते .
मंत्री नसलो तरीही कामे सुरूच
आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलताना आपल्याला चार वेळा मतदारांनी निवडून दिले , मागची 24 वर्षे राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करतो याची जाण जनतेला आहे . तुमचा आमदार मंत्री झाला नसला तरी आमदार म्हणून कुठे कमी पडला नाही , मतदार संघात कार्य सुरु आहे त्यावर माझी जनता समाधानी आहे . मला विरोधकांनी शिकवण्याची आणि सरकारवर टीका करण्याची गरज नाही
केबल कोणी अडवले ?
इन्टरनेट सेवा उपलब्ध करण्यासाठी ठिकठीकाणी केबल घालण्याचे काम सुरु होते आणि त्यासाठी नऊ महिने लागले . मध्यंतरी काळात हेच केबल अडवण्यासाठी पार्से , आगरवाडा , तुये येथे काही जणांनी खो घालण्याचा प्रयत्न केला , त्यांचे योगदान काय आहे असा सवाल आमदार सोपटे यांनी यावेळी उपस्थित केला .
फटिंगपणाचे लीडर फटिंग
आमदार दयानंद सोपटे यांनी कुणाचेही नाव न घेता केबल रोखण्याचे काम हे ज्या फटिंगपणाने नेते तयार केले त्याचेच फटिंगणानी काम रोखल्याचा दावा केला त्यामुळे इन्टरनेट सेवेला विलंभ झाल्याचा दावा केला .
आठ दिवसाच्या आत मांद्रे मोरजी सेवा
आमदार दयानंद सोपटे यांनी बोलतांना पुढे जशी सेवा पार्से भागातील विद्यार्थ्यांना दिली तिच सेवा आता आठ दिवसाच्या आत मोरजी आणि मांद्रे हि सेवा उपलब्ध करणार असल्याचे सांगितले .
विद्यार्थ्यांनाच्या गैरसोयी लक्षात घेवून ही सेवा कार्यरत केल्याचे सोपटे म्हणाले .पार्से पंचायत व परिसरात बसून विधार्थ्यानी या योजनेचा लाभ घेवून शिक्षणातून प्रगती करावी असे ते म्हणाले .
राजकारणातील हिरो कि झिरो ?
एक्सप्रेस कंपनीने मांद्रे मतदार संघातील नऊही पंचायत क्षेत्रात ज्यावेळी इन्टरनेट सेवा सुरु करण्यासाठी केबल घालण्याचे काम सुरु केले त्यावेळी काही जण रस्त्यावर उभे राहून तुमच्याकडे परवानगी आहे ती कोणी दिली , असे प्रश्न विचारून काम बंद पडण्याचा प्रयत्न केला, हि सुविधा कुणासाठी होती याचा त्यांनी विचार केला नाही , हि सेवा आमच्या मतदारांच्या मुलाना आणि सर्वाना होती असे सांगून विरोध करणारे आता राजकारणातील आता हिरो आहेत कि झिरो याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला सोपटे यांनी दिला .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.