Romi Konkani: आमदार क्रुझ सिल्वा मांडणार दोन खासगी ठराव
MLA Cruz Silva Dainik Gomantak

Cruz Silva: ‘रोमी’ कोकणीसाठी पावसाळी अधिवेशनात खासगी ठराव; जातीनिहाय जनगणना हाती घ्यावी

Romi Konkani: आमदार क्रुझ सिल्वा मांडणार दोन खासगी ठराव
Published on

रोमी लिपीतील कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा ग्लोबल कोकणी फोरम या संघटनेने केलेली असताना यासंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आपण खासगी ठराव मांडणार असल्याचे वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले.

रोमी कोकणीला राजमान्यता मिळावी तसेच जातीनिहाय जनगणना हाती घ्यावी यासाठी आपण दोन खासगी ठराव मांडणार असल्याचे सिल्वा यांनी सांगितले. दरम्यान, बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस हे या अधिवेशनात ख्रिस्ती मेस्त जातीला इतर मागास वर्गीयांचा दर्जा मिळावा आणि शेतकरी, दूध उत्पादक यांना कॅशलेस सबसिडी मिळावी यासाठी दोन खासगी ठराव मांडणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com