Goa Apprenticeship Scheme : आवडीच्या क्षेत्रात भविष्य घडविण्याचे ध्येय बाळगा; आमदार शेट्ये यांचे आवाहन

साखळी रवींद्र भवनात जागतिक युवा कौशल्यदिन साजरा
MLA Chandrakant Shetye
MLA Chandrakant Shetye Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim : अथक मेहनत व परिश्रम या जोरावर आपले भविष्य घडवताना, ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे, त्याच क्षेत्रात मजल मारण्याची तयारी युवा पिढीने ठेवावी. आपण जे काम करत आहोत, ते काम पूर्णक्षमतेने व आत्मीयतेने करणार व त्यात सफल होणारच, हे ध्येय बाळगून जर काम केले, तर कोणत्याही कार्यात अपयश हाती येणार नाही, असे प्रतिपादन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी साखळी रवींद्र भावनात केले.

कौशल विकास व व्यावसायिकता संचालनालयातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अप्रेंटीसशीप’ची नियुक्ती पत्रे वितरण कार्यक्रमात आमदार डॉ. शेट्ये बोलत होते.

व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट साखळीच्या नगराध्यक्ष रश्मी देसाई, डिचोली आयटीआयचे प्राचार्य जॉन कालदेरा, होंडा आयटीआयचे प्राचार्य निलेश गावस व इतरांची उपस्थिती होती.

राज्य सरकारचे ध्येय सध्या युवकांमध्ये सर्व प्रकारच्या कामाबाबत जागृती करण्याचे असून त्याचाच एक भाग म्हणून मोठ्या संख्येने युवकांना ‘अप्रेंटीसशीप’ कामाला घेतले जात आहे. सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण भविष्य घडवणार हा निर्धार करून युवांनी पुढे यावे.

MLA Chandrakant Shetye
Goa Accidental Death: कुडचडेत दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी

आज खाजगी क्षेत्रातही औद्योगिक व इतर माध्यमातून अनेक रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घेत आपले भविष्य घडवावे, असे आवाहनही आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी केले.

यावेळी विविध सरकारी तसेच खाजगी कंपन्या मधील रोजगार प्रशिक्षण पद्धतीने कामाला नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे संबंधित आस्थापनांच्या प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आली.

MLA Chandrakant Shetye
Goa Accidental Death: कुडचडेत दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी

संधीचा लाभ घ्या

सरकारच्या या रोजगार प्रशिक्षण योजनेला राज्यभरातील युवांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या प्रतिसादाप्रमाणेच युवांनी जर उपलब्ध संधीचा लाभ घेत कोणत्याही सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी असतानांमध्ये काम करण्याची तयारी दाखवली तर राज्यात बेरोजगारी हा विषय संपुष्टात येण्यास वेळ लागला लागणार नाही.

आपली मानसिकता बदलून युवा वर्गाने आपल्यासमोर येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. बेकार राहण्यापेक्षा अनुभव मिळवत त्यातून आर्थिक मिळकत घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com