Mahadayi Water Dispute: 'म्हादई प्रवाह'चा निर्णय गोव्याचा विजय नाही! हे तर सरकारने दाखवलेले लॉलीपॉप

काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांची टीका, सरकारला उत्सव साजरा करण्याची घाई
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute: म्हादई प्रवाह या नावाने म्हादईच्या पाणीवाटपासाठी जल प्राधिकरण स्थापन करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा उत्सव साजरा करण्याची घाई राज्यातील भाजप सरकारला झाली आहे. हा निर्णय म्हणजे गोव्याचा विजय नाही, असे मत काँग्रेस आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी व्यक्त केले.

Mahadayi Water Dispute
Kidney Disease in Goa: गोव्यात फैलावतोय किडनीचा गूढ आजार; डॉक्टरही झाले हैराण

आमदार फेरेरा म्हणाले की, एक म्हणजे अद्याप म्हादई जल प्राधिकरणाची स्थापना झालेली नाही, केवळ घोषणा केली आहे. त्यामुळे त्याचा उत्सव साजरा करणे घाईचे आहे. हा फक्त कॅबिनेटने घेतलेला निर्णय आहे. हा विजय म्हणून साजरा करण्याची ही वेळ नाही.

कारण जल प्राधिकरणाची स्थापना संसदेच्या कायद्याने करावी लागते आणि कायदा संमत करून मग प्राधिकरणाची स्थापना होत असते. हीच रचना आहे. प्राधिकरणात कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, सदस्य कोण आहेत, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक सदस्य आणि वेगवेगळ्या सरकारांचे प्रतिनिधी कोण आहेत, हे सर्व ठरवावे लागते.

मग स्टाफिंग करावे लागेल - लोकांची भरती करणे आणि त्यानंतर ते प्राधिकरण कार्यान्वित होईल. हा गोव्याचा विजय नाही, तर म्हादईच्या पाणी वळविण्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. तथापि, प्राधिकरणामुळे म्हादईच्या पाण्याचा वापर आणि अतिवापर यावर नियंत्रण आणि संतुलन राखले जाईल.

Mahadayi Water Dispute
Rajbhavan Book Scheme: लेखकाचे पहिले पुस्तक राजभवन करणार प्रकाशित, 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज

फेरेरा म्हणाले की, “आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार आहे. त्यांना हवा तेव्हा ते अध्यादेश काढतात. म्हणजे त्यांना खरोखरच वाटत असेल तर ते अध्यादेश काढून म्हादई जल प्राधिकरण कायदा आणू शकतात.

तसे करता येत नसेल तर हा निर्णय म्हणजे केवळ कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदारांना भुलविण्यासाठी दाखवलेला लॉलीपॉप आहे बाकी काही नाही. निवडणुका येतील आणि जातील, पण यातून काहीही ठोसपणे होणार नाही.

कर्नाटकचा या प्रकल्पाबाबतचा डीपीआर रद्द करण्याची आणि डीपीआर मागे घेण्याची आमची मागणी आहे. आम्ही ज्याची मागणी केलेली आहे ते मिळालेले नाही, त्यामुळे आताच उत्सव साजरा करणे घाईचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com