Land Grabbing Case: आमदार आरोलकरांना खंडपीठाचा दणका

जमीन हडपप्रकरणीचा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी गोवा खंडपीठाकडे केली होती
High Court Of Bombay at Goa
High Court Of Bombay at GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Land Grabbing Case: धारगळ येथील जमीन हडपप्रकरणीचा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी गोवा खंडपीठाकडे(High Court Of Bombay at Goa) केली होती.

मात्र, ही याचिका फेटाळण्यात आल्याने आरोलकर यांना दणका बसला असून त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याची चौकशी सुरूच राहणार आहे. त्यामुळे थंडावलेल्या या प्रकरणाला वेग येऊन चौकशीसाठी एसआयटीकडून आरोलकर यांना समन्स जारी होण्याची शक्यता आहे.

पेडणे तालुक्यातील धारगळ येथील सुमारे 1 लाख 44 चौ. मी. जमीन हडप केल्याप्रकरणाची तक्रार रवळू खलप यांनी पेडणे पोलिसांत 2020 मध्ये दिली होती.

पेडणे पोलिसांनी जीत आरोलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यात कोणतेच तपासकाम न करता ती तशीच प्रलंबित ठेवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com