सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या चिमुकल्याला सापडले आई-वडील

म्हापसा आझिलो इस्पितळातील घटना : मानव संसाधन महामंडळाचे आभार
Missing boy found in asilo hospital
Missing boy found in asilo hospitalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव : आपल्या आई - वडिलांबरोबर म्हापसा येथील आझिलो इस्पितळात आलेला एक लहान मुलगा अचानक वॉर्डमधून बाहेर आल्याने रस्ता चुकला आणि भरकटला. मात्र यावेळी इस्पितळात ड्युटीवर असलेल्या सुरक्षा राक्षकाने सतर्कता दाखवत त्या मुलाचा ताबा आपल्याकडे घेऊन सर्व वॉर्डात विचारपूस सुरू केली आणि सुमारे अर्ध्या तासाने त्याचे आई वडील हजर झाल्याने हा भटकलेला मुलगा सुखरूप आई - बाबांच्या स्वाधीन झाला.

Missing boy found in asilo hospital
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 व्हडल्यो खबरो (24th May 2022)

ही घटना सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. त्यावेळी ड्युटीवर नवनाथ नाईक या सुरक्षा रक्षकाने इस्पितळाच्या पार्किंग क्षेत्रात एक तीन वर्षांचा मुलगा रडत आपल्या आई वडिलांना शोधत असल्याचे त्याने पाहिले. अन्य कुणीच त्याच्याकडे लक्ष देत नसल्याचे पाहून त्याने त्या मुलाला स्वतःकडे घेतले आणि पर्यवेक्षकांना त्याची वर्दी दिली. त्यांनीही इकडे तिकडे चौकशी करूनही हा मुलगा कुणाचा हे कळत नसल्याने त्यांनी मुख्य सुरक्षा अधिकारी विजय गावस यांच्या नजरेस ही गोष्ट आणून दिली. तसेच ड्युटीवर असलेल्या पोलिसांनाही याची वर्दी दिली.

Missing boy found in asilo hospital
गुडी-पारोडा हमरस्त्यावर दुचाकींचा भीषण अपघात

सुरक्षा विभागाने लगेच हालचाल करत इस्पितळातील सर्व वॉर्डात अशा प्रकारे मुलगा सापडल्याची वर्दी दिली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने त्या मुलाचे आई वडील तिथे आले. मुल त्यांचेच असल्याची खात्री पटल्यावर ते त्यांच्या ताब्यात देण्यात आले. गोवा मानव संसाधन महामंडळातर्फे या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असून त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com