Minister Subhash Shirodkar
Minister Subhash ShirodkarDainik Gomantak

Mhadei Project : ‘म्हादई’च्या पाहणीबाबत कर्नाटकची नौटंकी : सुभाष शिरोडकर

Mhadei Project : न्यायालयीन प्रकरणाची सबब; ‘प्रवाह’कडून तारखा जाहीर

Mhadei Project :

पणजी, म्हादई खोऱ्याच्या संयुक्त पाहणीसाठी ‘प्रवाह’कडून तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, म्हादईचे प्रकरण न्यायालयात असल्याची सबब देत कर्नाटक सरकार संयुक्त पाहणीस येणे टाळत आहे.

त्यामुळे आता त्यावर ‘प्रवाह’ समिती काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

शिरोडकर यांनी सांगितले की, म्हादई खोऱ्याची संयुक्त पाहणी करण्यासाठी ’प्रवाह’ची (कल्याण आणि समरसतेसाठी प्रगतीशील नदी प्राधिकरण) स्थापना झाली आहे. या समितीवर म्हादई खोऱ्याची संयुक्त पाहणी करण्याविषयी ‘प्रवाह’कडून तारखा निश्‍चित झाल्या आहेत.

Minister Subhash Shirodkar
Goa: चिरेखाणी, धबधब्यात बुडून 35 जणांचा मृत्यू; युरींनी सरकारवर फोडले खापर, अहवाल जाहीर करण्याची मागणी

त्या तारखेनुसार गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र अशा तीन राज्यांच्या समितीचे सदस्य पाहणी करणार होते. परंतु म्हादईचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण सांगत कर्नाटक सरकारने पाहणीस तयार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, पावसाचे पाणी जमिनीत साठवण्यासाठी चर खोदून डोंगरमाथ्यावर कामे केली जातात.

म्हादईच्या पाण्यावर कर्नाटक सरकारने दावा केल्याने गोवा सरकारने त्याविरोधात पाणी तंटा लवादाकडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. ‘प्रवाह’ स्थापन झाल्यामुळे हा तिढा सुटेल असे वाटत होते; परंतु कर्नाटक सरकारने आपला हेकेखोरपणा अजून सोडलेला नाही.

- सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com