'तर, गोव्याची दिल्ली होण्यास वेळ लागणार नाही', मंत्री रवी नाईकांनी दिला इशारा; जमिनी जोपासण्याचे केले आवाहन

Ravi Naik: रवी पुढे म्हणाले, नारळाचा वापर देवापासून जेवणापर्यंत होतो. या अधिवेशनासाठी तामिळनाडूचे कृषिमंत्री आले आहेत, ते आपले विचार मांडतीलच.
Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा लहान राज्य असून, जमीन क्षेत्रही कमी आहे. दिल्लीतील लोक येथे येऊन राहत आहेत, त्यामुळे उर्वरित जमिनी लागवडीखाली आणून त्या जोपासल्या पाहिजेत, अन्यथा गोव्याची दिल्ली होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती कृषिमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली. नारळ परिषदेतील उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

रवी पुढे म्हणाले, नारळाचा वापर देवापासून जेवणापर्यंत होतो. या अधिवेशनासाठी तामिळनाडूचे कृषिमंत्री आले आहेत, ते आपले विचार मांडतीलच. तेथे वातावरणात आणि राजकीय उष्णताही आहे, अशी मिश्किल टिप्पणी रवी यांनी केली.

माडाची दारूही मिळते, हेही सांगण्यास रवी विसरले नाहीत. १९९१ साली आपण मुख्यमंत्री असताना नारळाची व सगळ्या प्रकारची रोपे देण्यास सुरुवात केली, ती पद्धत अजूनही सुरू आहे. राज्यात आंब्याची झाडांचीही लागवड होणे आवश्यक आहे, आंब्याची निर्यातही होत आहे, त्यामुळे लागवड वाढवणे गरजेचे आहे.

Ravi Naik
National Coconut Conclave: नारळ उत्‍पादनवाढीचा ‘रोडमॅप’! दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषद; तज्‍ज्ञ, शेतकऱ्यांच्‍या अनुभवांची देवाणघेवाण

महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जेव्हा आंब्याची मोफत रोपे देऊन आंबा वाढीसाठी प्रयत्न केला. तेव्हा पवार यांनी हापूस आंबा उत्पादित करावा, तो परदेशात जाईल, असे शेतकऱ्यांना सांगितले होते, असा किस्साही रवी यांनी आवर्जून सांगितला.

Ravi Naik
Coconut Cultivation: परागीभवनातून नारळ उत्पादन

राज्यात नारळ २५ रुपयांना मिळतो, तर शहाळे ६० रुपयांना मिळते. त्यामुळे नारळाचे कोणतेही उत्पादन केले तरी त्याला मागणी आहे. गोव्याचे हे दायज असून ते सांभाळावे लागेल, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com