मंत्री गोविंद गावडे यांनी फोंडा मामलेदार कार्यालयाला अचानक भेट दिली; दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती या गोष्टी त्यांनी पडताळून पाहिल्या; दरम्यान, सेवा वितरीत करण्यात अयशस्वी झाल्यास तसेच, कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
(Minister Govind Gaude pays surprise visit to Ponda Mamlatdar office)
फोंडा परिसरात रात्र गस्त वाढविण्याची मंत्री गोविंद गावडे यांची पोलिसांना सूचना
फोंडा परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: रात्रीच्या चोरीच्या घटनेत अलिकडे वाढ झाल्याचे दिसून येते. यापार्श्वभूमीवर क्रिडा आणि कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी फोंडा पोलिसांना परिसरात रात्र गस्त वाढविण्याबाबत सुचना केली आहे. याबाबत मंत्री गोविंद गावडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. फोंडाचे पोलिस निरीक्षक आणि गोव्याचे पोलिस उपाअधिक्षक यांच्याशी फोंड्यात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चर्चा झाली. मी त्यांना फोंडा परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याबाबत सूनचा केली आहे. तसेच, चोरीच्या घटनांचा सखोल तपास करण्याबाबत सूचना केली आहे. असे ट्विट गोविंद गावडे यांनी केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.