मडगाव बसस्‍थानक बनला मिनी सोनसोडो!

अधिकाऱ्यांनी केली पाहणी: कचरा हटवण्याची गोवा कॅनची मागणी
Roland Martin and Team
Roland Martin and TeamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फातोर्डा: ‘गोवा कॅन’तर्फे मडगाव येथील जुन्या बसस्थानकावर आयोजित केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड झाल्या. येथे कित्येक वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्यामुळे परिसराला मिनी सोनसोडोचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अपघातात निकामी झालेल्या गाड्या, रिकाम्‍या दारूच्या बाटल्यांचा खच, कोणताही अधिकृत परवाना नसताना सुरू केलेली खाद्यपदार्थाची दुकाने अशाने या बसस्थानकाला बकाल स्वरूप आले आहे. हे सर्व तातडीने हटविण्यात यावे, अशी सूचना ‘गोवा कॅन’चे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी केली आहे.

Roland Martin and Team
फोंड्यात विजेचा लपंडाव सुरूच

गोवा कॅनतर्फे आयोजित या पाहणीत मडगाव आरोग्य सेवा, मडगाव नगरपालिका, पोलिस खाते, अन्न आणि औषध प्रशासन खाते, गोवा फलोत्पादन विभागासह इतर खात्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. या पाहणीच्या वेळी तेथे कित्येक वर्षांपासून पडून असलेला कचरा आहे त्याच स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. या बरोबरच अपघातात सापडलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा पडलेला खच, काही ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या, बस शेडवर पडून राहिलेला पालापाचोळ्याचा कचरा हे सर्व येत्या काही दिवसांत हटविण्यात यावे अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांना मार्टिन यांनी केली. येथे असलेली काही खाद्य पदार्थाची दुकाने अन्न, औषध प्रशासन खात्याचा आणि नगरपालिकेचा कुठलाही परवाना नसताना चालविण्यात येत असल्याबद्दल त्यांना नियमावलीच्या आधारावर परवाना करून देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांना मार्टिन यांनी केली.

येथे असलेल्या सुलभ शौचालयाचीही दूरवस्‍था झाली आहे. येथील दूषित पाणी थेट गटारात सोडण्यात येत आहे. अशाने येथे अस्वछता पसरत असल्याने या विषयाकडे लक्ष देण्याची मागणी मार्टिन यांनी केली. 7 जून रोजी जागतिक अन्न आणि सुरक्षा दिवस असून त्यापूर्वी येथील परिसर स्वच्छ करावा अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Stray Dogs Sterilization
Goa Aggressive Dog Breeds Ban
Goa Hourly Teachers Regularization
Calangute Water Shortage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com