Mineral Transport : खनिज वाहतुकीवरून ग्रामसभा तापली

Mineral Transport Bicholim : पिळगाव पंचायत ः बेकायदा वाहतूक बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
Mineral Transport
Mineral TransportDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली, खनिज वाहतुकीच्या मुद्यावरून पिळगाव पंचायतीची आजची ग्रामसभा काहीसी तापली.

पिळगाव - सारमानसमार्गे चालू असलेली ‘वेदांता’ची खनिज वाहतूक बेकायदेशीर असल्याचा दावा ग्रामस्थांनी ग्रामसभेत करून सध्या चालू असलेली खनिज वाहतूक बंद करा अशी मागणी केली, तर खनिज वाहतूक सुरू करताना ‘वेदांता’ कंपनीने पंचायतीला कल्पना दिलेली नाही, असे स्पष्टीकरण सरपंचांनी या मागणीवेळी दिले.

पिळगाव पंचायतीची ग्रामसभा आज (रविवारी) सरपंच मोहिनी जल्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेस उपसरपंच सुनील वायंगणकर यांच्यासह उमाकांत परब गावकर, सोनिया बेतकीकर, चेतन खोडगिणकर, शर्मिला वालावलकर आणि स्वप्नील फडते हे सर्व पंच सदस्य उपस्थित होते.

सरपंच मोहिनी जल्मी यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा दुपारी साधारण पाऊण वाजता आटोपली. या ग्रामसभेत रस्त्याच्या बाजूने वाढलेली झुडूपे आदी गावातील समस्यांवर चर्चा झाली. पावसाळ्यात भेडसावणाऱ्या समस्या दूर करा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

शेतकऱ्यांची जागा; रस्ता चिखलमय

पिळगाव - सारमानसमार्गे सध्या सुरू असलेली खनिज वाहतूक बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तेतून ही खनिज वाहतूक करण्यात येत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्ता चिखलमय बनत आहे आदी मुद्दे अनिल सालेलकर आणि इतरांनी उपस्थित करून खनिज वाहतूक बंद करा, अशी मागणी केली.

Mineral Transport
B 32 Muthal 44 vare : ब्रा साईज पाहणाऱ्यांच्या कानाखाली वाजवणारा विद्रोही मल्याळम चित्रपट माहितेय का?...

खाण व्यवसाय आणि खनिज वाहतूक सुरू करताना ‘वेदांता’ कंपनीने पंचायतीला विश्वासात घेतलेले नाही. पंचायत ग्रामस्थांच्या पाठीशी आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार पंचायत आवश्यक ती पावले उचलणार. पिळगावमधील कामगार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.

- मोहिनी जल्मी, सरपंच, पिळगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com