Goa Mining: 'ट्रकांच्या धडधडीमुळे झोप येईना', खनिज वाहतूकप्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिक नाराज

Bicholim Mining: खनिज वाहतुकीसंदर्भात तयार केलेल्या नियमावलीनुसार रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजेपर्यंत खनिज वाहतूक करण्यास ट्रकवाल्यांना मुभा दिली आहे.
Bicholim Mining Issue
Bicholim Mining TransportX
Published on
Updated on

Impact of night mineral transport on sleep in Bicholim

डिचोली: ‘वेदांता’ कंपनीच्या खाणीवरून शुक्रवारी रात्रीपासून खनिज वाहतूक सुरू झाली असून, मध्यरात्री ते पहाटेपर्यंत ट्रकांची धडधड चालते. रात्रीच्यावेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीत कोणतेही विघ्न येता कामा नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे.

खनिज वाहतुकीसंदर्भात तयार केलेल्या नियमावलीनुसार रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजेपर्यंत खनिज वाहतूक करण्यास ट्रकवाल्यांना मुभा दिली आहे. मात्र, रात्रीच्या खनिज वाहतुकीमुळे झोपमोड होते, अशी तक्रार हेमंत पालकर तसेच सारमानस भागातील काही लोकांनी केली आहे. त्यामुळे रात्रीच्या खनिज वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तोडगा काढावा, अशी लोकांची मागणी आहे.

तर रात्रीच्यावेळी खनिज वाहतूक ही दिवसाच्या मानाने अधिक सुरक्षित आहे, असा ट्रकमालक संघटनेचा दावा आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तब्बल २२ दिवसांच्या ब्रेकनंतर १३ डिसेंबरपासून डिचोलीतील खाणीवरून खनिज वाहतूक सुरू झाली आहे. माठवाडा जंक्शनजवळील रस्ता शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळे पिळगाव-सारमानस जंक्शनकडून सार्वजनिक रस्त्यावरून सारमानस जेटीपर्यंत ही खनिज वाहतूक करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून खनिज वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, आता रात्रीच्यावेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे सारमानस भागातील लोक नाराज आहेत.

Bicholim Mining Issue
Goa Mining: खाणीच्या विळख्यातून आमचा गाव वाचवा, खटले मागे घ्या; अडवलपालवासीयांचा आक्रोश

दिवसा ताशी ४०, तर रात्री ताशी ५० ट्रिप

सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्रीच्यावेळीही खनिज वाहतुकीस ट्रकना मुभा दिली आहे. विश्रांतीची वेळ सोडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि रात्री ११.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत खनिज वाहतूक करता येणार आहे. दिवसा दर ताशी ४० आणि रात्री दर ताशी ५० ट्रिप खनिज वाहतूक करण्यास मुभा दिली आहे.

Bicholim Mining Issue
Vedanta Mining Goa: 'वेदांता'चा प्रस्ताव अमान्य, शेतकरी मागण्यांवर ठाम; महिन्यानंतरही पिळगावात आंदोलन सुरुच

४३ ट्रकांचे गट

रात्री एकाचवेळी सर्व ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरविल्यास समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दिवशी ४३ ट्रक, अशी विभागणी केली आहे. नियमावली पाळून रात्रीची खनिज वाहतूक करण्यात येणार आहे, असे ट्रकमालक संघटनेचे सरचिटणीस सुभाष किनळकर यांनी सांगून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com