Marcel Fish Market : माशेल मासळी मार्केटचे स्थलांतर रखडले; पंचायत हतबल

नव्या जागेत जाण्यास विक्रेत्यांचा नकार; बगलमार्गावरही मासेविक्री
Goa Fish Market
Goa Fish MarketDaink Gomantak
Published on
Updated on

माशेल पंचक्रोशीत सुसज्ज बहुउद्देशीय कदंब प्रकल्प साकारण्यात आला असून एकाच ठिकाणी बसस्थानकासह मासळी, भाजी, फळ मार्केटसह इतरही अनेक आस्थापने आहेत. या ठिकाणी भाजी मार्केट उत्तम प्रकारे सुरू असून मासळी मार्केटचा तिढा अद्याप कायम आहे.

यापूर्वी मासळी मार्केटचे स्थलांतर एकदा झाले आणि दोनच दिवसांत विक्रेत्यांनी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी मासेविक्री सुरू केली. या प्रकारापुढे पंचायत मंडळही हतबल असल्यामुळे नवे सुसज्ज मार्केट मोकळेच आहे.

Goa Fish Market
पोर्तुगीज भाषेत बनावट कागदपत्रं, सरकारी बाबूंचा वरदहस्त; गोव्यात जमीन हडप करणाऱ्या टोळीची Modus Operandi

कदंब बसस्थानकातील प्रकल्पातील अनेक अडचणी, समस्या मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रयत्नांतून दूर झाल्या. बसस्थानक व इतर कार्यालये, दुकानांचा प्रश्‍न मार्गी लागला. माशेलातील पार्किंगचा प्रश्‍न काही प्रमाणात कमी झाला, गर्दी कमी झाली; पण मासळी मार्केटचे स्थलांतर मात्र रखडलेच. स्थानिक पंचायत मंडळाने नोटिसीद्वारे स्थलांतर केले; पण दोनच दिवसांत स्थलांतराचा फज्जा उडाला.

गेले पंधरा दिवस आज, उद्या स्थलांतर होईल, असे सांगितले जाते. मासळी मार्केटमधील विक्रेत्यांच्या काही समस्या आहेत, त्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याचे ते सांगतात; पण प्रत्यक्षात काहीच हालचाल होत नसल्यामुळे एका माशेलात दोन ठिकाणी मासेविक्री सुरू आहे.

बगलमार्गावरही मोठ्या प्रमाणात मासळी विक्री केली जाते. त्या ठिकाणीही सकाळच्यावेळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी होते. जुन्या मासळी मार्केटातही गर्दी होत असल्यामुळे वाहने रस्त्यांवरच ठेवली जातात. त्यामुळे बाजारात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

Goa Fish Market
CNG-PNG Price: महागाईत जनतेला मोठा दिलासा, CNG 8 रुपयांनी स्वस्त, PNG चे ही दर घसरले

या दोन्ही ठिकाणच्या मासळी विक्रेत्यांना एकाच ठिकाणी बसविणे आवश्‍यक आहे. तशी जुन्या मार्केटातील विक्रेत्यांची मागणीही आहे. परंतु त्याकडे कोणीच लक्ष देत नाहीत. अशा वादात नव्या जागेत मासळी मार्केटचे स्थलांतर रखडले आहे.

सामंजस्याने तोडगा काढा

आता मासळी मार्केट स्थलांतरासाठी पुढे काय? हा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे. मासळी मार्केटसाठी जागा निश्‍चित आहे. सर्व व्यवस्था आहे, असे पंचायतीचे मत आहे. नेमके घोडे कुठे अडते, त्याबाबत सामंजस्याने तोडगा काढणे गरजेचे आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे.

‘प्रश्‍न जैसे थे!’

जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, पंचायतीने आमच्या मागण्या पूर्ण करणे आवश्‍यक आहे, असेही मासळी विक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंचायतीचा मासळी मार्केटच्या स्थलांतराचा दुसरा प्रयोगही यशस्वी झाला नाही. जुनी शेड पाडण्याचा प्रयत्नही मासळी विक्रेत्यांनी हाणून पाडला. त्यामुळे हा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com