योग्य सोयीनंतरच स्थलांतर करा; वास्कोतील मासळी विक्रेत्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वास्को मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांनी तात्पुरत्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छता अयोग्य असल्याने त्या ठिकाणी योग्य ती सोय करून दिल्यानंतरच स्थलांतर करणार असल्याचे पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
Vasco Fish Market
Vasco Fish MarketDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : वास्को मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांनी तात्पुरत्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छता अयोग्य असल्याने त्या ठिकाणी योग्य ती सोय करून दिल्यानंतरच स्थलांतर करणार असल्याचे पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. शुक्रवारपर्यंत तोडगा काढण्याची विनंती ह्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Vasco Fish Market
एसजीपीडीए बाजारातील कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्णय

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी बुधवारी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन मासळी मार्केट प्रकल्पाच्या पुनर्बांधणीचे काम पुढे नेण्याचे ठरवून देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात आलेल्या मासळी मार्केटमधून मासळी विक्रेत्यांना तात्पुरत्या शेडमध्ये स्थलांतरित करण्याचे ठरवले होते व त्यानुसार सध्याच्या मासळी मार्केटचे पत्रे काढण्याचे काम कालपासूनच सुरू केले होते. आज गुरुवारपासून मासळी मार्केट पाडण्याचे काम चालू होणार होते.

मासळी विक्रेत्यांसाठी देव दामोदर ट्रस्टच्या जागेत बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये मासळी विक्रेत्यांचे काल बुधवारी स्थलांतर होणार होते, परंतु या जागेत करारानुसार योग्य त्या सोयीचा अभाव असल्याने मासळी विक्रेत्यांनी त्या तात्पूरत्या शेडमध्ये जाणे आजही टाळले व पूर्वीच्या मासळी मार्केटच्या ठिकाणी रस्त्यावर बसून मासे विक्री सुरू केली.

तात्पुरत्या शेडमध्ये अजून त्रुटी जाणवत असल्याने आज मासे विक्रेत्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून तात्पुरत्या शेडमध्ये योग्य ती सोय करून दिल्यास शुक्रवारपर्यंत या स्थलांतर होणार असल्याचे कळवले आहे. आज मासळी मार्केटचे पत्रे काढण्याचे काम चालूच होते. परंतु मासळी विक्रेत्यांनी रस्त्यावर बसून मासळी विक्री सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com