कळंगुटमध्ये यापुढे व्यावसायिक भांडणे नकोत

मायकल लोबो : खोब्रावाडा येथील घटनेचा तपास करण्याची मागणी
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट : कळंगुटात डान्सबार तसेच नाईट क्लब प्रकरणावरून देशी पर्यटकांशी झालेल्या भांडणात क्लबच्या कर्मचारी शाहीन सौदागर यांच्या मुलांना झालेल्या मारहाण प्रकरणात आपण चालवत असलेल्या डेव्हल नाईट क्लबचा काहीच संबंध नाही, असे क्लबचे चालक विवेक शर्मा यांनी सांगितले. आपण चालवत असलेला क्लब हा माजी उपमुख्यमंत्री बाबू आंजगावकर यांच्या मालकीचा असल्याचे शर्मा म्हणाले. आता याप्रकरणात मायकल लोबोंनी असले प्रकार खपवून घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

खोब्रा वाड्यातील डेविल नाईट क्लबमध्ये सुपरवायझर सौदागर यांनी सांगितले की, आपल्या तीन तरुण मुलांचा येथील क्लबशी काडीचाही संबंध नाही. 7 मे रोजी येथील डेविल नाईट क्लबच्या आवारात स्थानिकांकडून आपल्या मुलाला झालेली मारहाणही आपण आणि आपली मुले परप्रांतीय असल्यानेच हेतूपुरस्सर आहे. मारहाण प्रकरणाची सखोल पोलिस चौकशी होणे आवश्यक असल्याचे सौदागर यांनी सांगितले.

Michael Lobo
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 मुखेल खबरो (20th May 2022)

कळंगुट पोलिसांनी खोब्रावाडा- कळंगुटात घडलेल्या मारहाण प्रकरण तसेच बेकायदा चालणाऱ्या डान्सबार तसेच नाईटक्लब प्रकरणांचा योग्य तपास करीत दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री मायकल लोबो यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते लोबो म्हणाले, या आधी कळंगुट समुद्र किनारी डान्सबार तसेच नाईट क्लब प्रकरणांवरून स्थानिक तसेच परप्रांतीय व्यवसायिकांत टोळीयुद्ध झाल्याची आपण पाहिली आहेत. तत्कालीन निरीक्षक असलेल्या नोलास्को रापोझ यांचे निलंबन झाल्याचेही उदाहरण ताजे आहे. मात्र, आपण यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही, असेही लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com