Goa: '..क्रिकेटपटू व्हायचंय'! चिठ्ठी लिहून 16 वर्षाच्या मुलाने गाठली दिल्ली; मडगाव स्टेशनवरील CCTV मुळे झाला उलगडा

Goa boy cricket news: क्रिकेटपटू होण्याच्या ध्यासापायी एका सोळा वर्षीय मुलाने भलतेच साहस करताना घरातून पळून चक्क दिल्ली गाठण्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना मुलाला सुखरूप शोधून काढले.
Goa Pune flight late night
FlightDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: क्रिकेटपटू होण्याच्या ध्यासापायी एका सोळा वर्षीय मुलाने भलतेच साहस करताना घरातून पळून चक्क दिल्ली गाठण्याची घटना उघडकीस आली आहे. हा मुलगा दिल्ली येथे असल्याची पक्की माहिती मायणा कुडतरी पोलिसांना मिळाल्यानंतर संबधितांनी दिल्ली गाठून त्या मुलाला सुखरूप शोधून काढले.

१६ ऑगस्ट रोजी मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार पोलिसात नोंद झाली होती. पीडिताच्या वडिलाने ही तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली होती.

Goa Pune flight late night
Goa Crime: गोवा पोलिस ‘ॲक्‍शन मोड’वर! 48 जणांना घेतले ताब्यात; 4 जणांना अटक

त्या मुलाला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. घरातून निघून जाताना त्याने आपण दिल्ली येथे जात असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी त्याच्या आधारे तपासकामाला सुरुवात केली असता, तो मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरून दिल्लीला जाणाऱ्या मंगला एक्सप्रेस रेल्वेत चढल्याचे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. लागलीच पोलिसांनी याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले.

Goa Pune flight late night
Goa Crime: सिलिंडर डोक्यात हाणला, रोडरेजवरून 2 सख्ख्या भावांना चार ते पाच जणांकडून मारहाण

पोलिस शिपाई एजाज शेख व समीर शेख या दोघांना दिल्ली येथे पाठवून दिले. तेथे तो पोलिसांना सापडला. तेथील एका क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी आपण घरातून दिल्ली येथे गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पुढील तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com