Mhaje Ghar Yojana: "म्हज्या गोंयकारांक चवथीचें गिफ्ट" मुख्यमंत्र्यांची घोषणा! माझे घर योजनेतून 450 कुटुंबांना मिळणार मालकी हक्क

Goa housing scheme 2025: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'माझे घर' योजना ही गोवेकरांसाठी गणेश चतुर्थीची खास भेट असल्याचे जाहीर केले आहे
Goa CM housing announcement
Goa CM housing announcementDainik Gomantak
Published on
Updated on

Mhaje Ghar Yojana Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'माझे घर' योजना ही गोवेकरांसाठी गणेश चतुर्थीची खास भेट असल्याचे जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत १५ सप्टेंबरनंतर अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. गोवेकरांना त्यांच्या हक्काच्या घरात राहायला मिळावं आणि केवळ राजकारणासाठी या मुद्याचा वापर करणाऱ्यांना ठोस उत्तर आता गोमंतकीयांनीच द्यायचंय असं मुख्यमंत्री म्हणाले.

काय आहे 'माझे घर' योजना?

डॉ. सावंत यांनी घरे नियमित करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकारण करणाऱ्या टीकाकारांना आवाहन केले आहे की, जनतेने अशा राजकारण्यांना योग्य जागा दाखवून द्यावी. हे निर्णय जनतेच्या हितासाठीच घेतले जात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ३० वर्षांपूर्वी दिलेल्या फ्लॅट्सची स्थिती आता अत्यंत बिकट झाली आहे, घर मालकाला घर दुरुस्त करता येत नाही किंवा त्यांच्याजवळ घराचे मालकी हक्क नाहीत, मात्र या योजनेमधून सरकार सुमारे ४५० कुटुंबांना मोठा दिलासा देणार असून त्यांना जमिनीचे मालकी हक्क दिले जातील. घरातील माणसांना ते घर सरकारचं नाही तर स्वतःचं वाटावं म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

या योजनेमुळे साखळी मतदारसंघातील न्हावेली गावातील कोमुनिदाद जमिनीत बांधलेल्या सुमारे ४०० घरांना 'माझे घर' कायद्याचा लाभ होणार आहे. न्हावेली कोमुनिदादचे अध्यक्ष सिद्धांत गावस यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून घरे नियमित करण्यासाठी धडपड करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना आता यश येणार आहे. त्यांनी या कायद्याचे स्वागत करत गोव्यातील सर्व कोमुनिदाद समित्यांना या कायद्याला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.

Goa CM housing announcement
'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पाळी पंचायतीच्या पंचायत इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यात बोलताना सांगितले होते की, सप्टेंबर महिन्यापासून हा कायदा लागू होईल. त्यामुळे लोकांनी आपापल्या घरांची कागदपत्रे तयार करून ठेवावीत. हा कायदा गोव्यातील लोकांच्या घरांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com