Kalsa Banduri Project: 'कळसा-भांडुरासाठी लवकर दाखले द्या'! कर्नाटक CM सिद्धरामय्‍यांचे PM मोदींना साकडे; पत्र लिहून केली मागणी

Mhadei River Dispute: म्‍हादई नदीवरील कर्नाटकच्‍या कळसा-भांडुरा प्रकल्‍पासाठी लवकरात लवकर पर्यावरणीय दाखले मिळावे, अशी मागणी करणारे पत्र कर्नाटकचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी पुन्‍हा एकदा पाठवले आहे.
Kalasa Banduri Project Karantaka
Goa Karnataka Mhadei Water DisputrDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्‍हादई नदीवरील कर्नाटकच्‍या कळसा-भांडुरा प्रकल्‍पासाठी लवकरात लवकर पर्यावरणीय दाखले मिळावे, अशी मागणी करणारे पत्र कर्नाटकचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी पुन्‍हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे.

म्‍हादईचा वाद अनेक वर्षांपासून गोवा, कर्नाटक आणि महाराष्‍ट्र या तीन राज्‍यांमध्‍ये सुरू आहे. यासंदर्भात स्‍थापन केलेल्‍या पाणी तंटा लवादाने अंतिम निवाडा दिल्‍यानंतर गोव्‍यासह तिन्‍ही राज्‍यांनी सर्वोच्च न्‍यायालयात धाव घेतली आहे.

Kalasa Banduri Project Karantaka
Mhadei River: कर्नाटकचे पितळ उघडे! खोट्या माहितीद्वारे घेतले जागतिक बँकेचे कर्ज! 'म्‍हादई'प्रश्‍नी गोवा सरकार देणार पुरावे

तेथे याप्रकरणी सुनावण्‍या सुरू असतानाही कर्नाटकने बेकायदेशीररीत्‍या म्‍हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्‍पाचे काम सुरू ठेवले. त्‍यालाही गोव्‍याने आक्षेप घेतला असून, त्‍यासंदर्भातील नवे पुरावे गोवा सरकारकडून सर्वोच्च न्‍यायालयात सादर केले जाणार आहेत. असे असतानाही कर्नाटक सरकारने गेल्‍या काही वर्षांपासून या प्रकल्‍पाला केंद्र सरकारकडून पर्यावरणीय दाखले मिळवण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू केले आहेत.

Kalasa Banduri Project Karantaka
Kalasa Banduri Project: कळसा-भंडुरावर मोठी अपडेट! कर्नाटकच्या राज्यपालांनी दिला 9.27 एकर जमीन ताब्यात घेण्याचा आदेश

कर्नाटकच्‍या कळसा-भांडुरा प्रकल्‍पाला वन, पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाकडून पर्यावरणीय परवाने मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्‍तक्षेप करावा, अशी मागणी सिद्धरामय्‍या यांनी पंतप्रधान मोदींना नव्‍याने सादर केलेल्‍या पत्रातून केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com