Mhadei River: हजारो वर्षांपासून कुळागरांचे वैभव टिकवणारी, गोव्याची जीवनदायिनी 'म्हादई'; कर्नाटकची वक्रदृष्टी आणि अस्तित्वाचा गंभीर प्रश्न

Goa Karnataka Water Dispute: कर्नाटक कळसा भांडुरा येथे धरणे उभारून म्हादई नदीवर घाला घालण्याच्या तयारीत नेहमीच तत्पर राहिले आहे. त्यामुळे भविष्यात म्हादई नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.
Goa Karnataka water dispute
Mhadei River Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्याची तथा गोवा राज्याची जीवनदायिनी म्हणजे म्हादई नदी. ही नदी गेल्या हजारो वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून आहे. निसर्गरम्य परिसरातून खळखळ आवाज करीत वाहणाऱ्या म्हादई नदीचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची बनली आहे.

किंबहूना सरकारने देखील म्हादई नदीच्या अस्तित्वासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे. कर्नाटक सरकार कळसा भांडुरा येथे धरणे उभारून म्हादई नदीवर घाला घालण्याच्या तयारीत नेहमीच तत्पर राहिले आहे. त्यामुळे भविष्यात म्हादई नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. सत्तरी तालुक्यात उस्ते, कडवळ, कुमठळ, झाडांनी, वायंगिणी, सोनाळ, तार, कुडशे, शिर सावर्डे अशा अनेक गावातून म्हादईचे प्रयाण होते.

म्हादई नदीच्या किनारी भागात आजपर्यंत पोफळीची (सुपारी) झाडे, नारळ, केळी आदींची लागवड पाहावयास मिळते. त्यावरच लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. सत्तरीतील म्हादई नदीच्या किनारी कुळागरे वसलेली आहेत. कुळागरांचे हे वैभव कायम टिकवून राहण्यासाठी म्हादई नदीचे अस्तित्व टिकविणे जरुरीचे आहे.

म्हादईचे पाणी कर्नाटक राज्याने सर्वांना अंधारात ठेवून या आधीच वळविले आहे. म्हादई बचाव आंदोलन हे अस्त्र वापरले गेले आहे. याबाबत सरकार काही घाबरण्याची गरज नाही, म्हादईबाबत योग्य निवाडा होईल असा धीर लोकांना देत आहे. परंतु कळसा भांडुरा येथे व अन्य नऊ ठिकाणी धरणे बांधण्याचा कर्नाटकचा डाव यशस्वी झाला, तर गोव्याचे भवितव्य धोक्यात येणार आहे.

Goa Karnataka water dispute
Mhadei Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पाची फाईल गहाळ; 7 वर्षांनी पोलिस तक्रार दाखल; केंद्रीय समिती 6 ऑक्टोबरपूर्वी येणार गोव्यात

रेती उपशाचा म्हादईवर घाला

सत्तरी तालुक्यात म्हादई नदी व उपनद्यांमध्ये बेकायदेशीरपणे रेती उपसा बिनधास्तपणे केला जात आहे. नदी पात्रातील, रेती दगड यांचे उत्खनन केले जात आहे. त्याचे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

Goa Karnataka water dispute
Mhadei River: 'म्हादई' प्रश्नाची तीव्रता कळत असूनही गोवा का तोंड वळवून उभा आहे? तो मुठी का आवळत नाही?

सेंद्रीय पुरण शेती लोप

म्हादईत पूर्वी हिवाळा, उन्हाळ्यात नदी काठावर सेंद्रीय पुरण शेती केली जात होती, पण काही वर्षांपूर्वी सरकारने म्हादई नदी पात्रात वसंत बंधारे बांधले व ही शेती लोप पावली. पण गतवर्षी २०२४-२५ पासून शिर सावर्डे, तार या गावात काहींनी सेंद्रीय पुरण शेती केली आहे. त्यामुळे म्हादई नदी भात व अन्य पिकासाठी वरदानच ठरलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com