Mhadei Hearing: म्हादईची 'सर्वोच्च' सुनावणी रखडली; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय!!

Mhadei Water Dispute: या सुनावणीसाठी महाधिवक्ता ॲड देविदास पांगम, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी दिल्लीत दाखल झाले होते
Supreme Court Decision
Supreme Court Decision Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला वळवू न देण्यासंदर्भातील गोव्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवार(ता.२३) सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी महाधिवक्ता ॲड देविदास पांगम, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी दिल्लीत दाखल झाले होते मात्र आता ही सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. आज म्हादईच्या बाबतीत आज सुनावणी होणार म्हणून पथक दिल्लीला गेलं होतं.

सुनावणीच्या विषय काय?

म्हादईचा वाद खरा तर गोवा आणि कर्नाटक यांच्यामध्ये होता मात्र आता हा वाद केवळ या दोन राज्यांमध्ये राहिलेला नाही. विर्डी धारणासंबंधीचे काम पूर्ण व्हावे म्हणून महाराष्ट्राने गोव्याला प्रतिवादी बनवून याचिका दाखल केली आहे, यावर देखील सर्वोच्य न्यायालयात सुनावणी होईल. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांनी दाखल केलेल्या विशेष याचिकांवर तसेच अवमान याचिकांवर देखील सुनावणी होणार आहे.

वर्ष २०१८ मध्ये म्हादई जलतंटा लवादाने दिलेला निवडा गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्राला मान्य नसल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. यामधील एका याचिकेत गोव्याने कर्नाटक विरुद्ध अवमान याचिका देखील सादर केली आहे.

कर्नाटक- गोवा वाद:

म्हादई नदीचे पाणी कर्नाटक पळवण्याचा प्रयत्न करत आहे, यामुळे गोव्यासमोर पुन्हा एकदा पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीये. या संदर्भात गोव्याने म्हादई नदीचे पाणी वळवल्यासंदर्भात कर्नाटकविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

Supreme Court Decision
Mhadei Dispute: 'म्हादई पाणी'प्रश्नाबाबत सुनावणीवर गोवा सरकारचे लक्ष! सर्व याचिकांचा लेखाजोखा मांडला जाणार

कर्नाटकाने कोणत्याही परवानगीविना जंगलतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्यासंदर्भात मूळ याचिका आणि त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा कर्नाटकाने भंग केल्याने न्यायालयाच्या बेअदबीची दाखल केलेली याचिका, कर्नाटकाने काम सुरू केल्याचे पुरावे मांडणारा अर्ज अशा सर्व याचिका गोव्याकडून सादर करण्यात आल्या आहेत.

सरन्यायाधीश संजीव खन्ना,न्यायमूर्ती संजीव कुमार तसेच न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या पिठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण आता पुढील आठवड्यात होणाऱ्या या सुनावणीच्यावेळी गोव्याकडून जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी, अधीक्षक अभियंते दिलीप नाईक आणि वकिलांचा गट उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com