पणजी: मेरशी येथे जयेश चोडणकर याच्या खूनप्रकरणातील संशयित प्रीतेश अडकोणकर याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन दिला आहे.
जुने गोवे पोलिसांनी संशयिताविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले असले तरी त्यासंदर्भातचे पुरावे सादर करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने जामीन देताना नोंदवले आहेत.
संशयिताने वैयक्तिक ५० हजार रुपयांचा जाचमुचलका व तत्सम रक्कमेचे दोन हमीदार सादर करावेत. साक्षीदारांना धमकावण्याचा किंवा आमिष दाखवण्याचा प्रयत्न करू नये. जामिनावर सुटका झाल्यापासून आठ दिवसांत त्याने पासपोर्ट न्यायालयात जमा करावा, सुनावणीवेळी उपस्थिती लावावी, इतर कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणामध्ये गुंतू नये, परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाऊ नये, प्रत्येक रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत खटल्यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत पोलिसांत हजेरी लावावी, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.